अकोला: अद्ययावत माहिती न ठेवणे कृषी सेवा केंद्रांना चांगलेच भोवले आहे. नऊ कृषी सेवा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. हंगामामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाकडून जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात येत आहे. कृषी सेवा केंद्रांकडून परवाना घेतल्यापासून व्यवहार न करणे, तसेच काही कृषी सेवा केंद्रांचे माहिती नसल्याचे समोर आले आहे.
सोयाबीन बियाणे व खतासाठी शेतकऱ्यांना काही विक्रेत्यांनी वेठीस धरल्याची प्रकार समोर आले आहेत. शेतकऱ्यांकडून बियाणे उगवले नसल्याच्या सातत्याने तक्रारी येत आहेत. काही ठिकाणी कृषी विभागामार्फत कृषी सेवा केंद्रांची पाहणी केली असता त्यामध्ये कृषी सेवा केंद्रांकडून अद्ययावत माहिती ठेवली नसल्याचे आढळून आले.
हेही वाचा… खबरदार! गोठ्यातील जनावर वर्दळीच्या रस्त्यावर सोडल्यास…
तसेच परवाना घेतल्याच्या काळापासून एकही व्यवहार केला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून त्या कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करीत नऊ परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. त्यामध्ये बियाण्यांचे तीन, खतांचे दोन व कीटकनाशकांच्या चार परवान्यांचा समावेश आहे.