उपराजधानीतील ११ डॉक्टरांचा विधायक पुढाकार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या बुलढाण्यातील दोन्ही जवानांच्या कुटुंबीयांना गरजेनुसार आयुष्यभर नि:शुल्क उपचार देण्यासाठी उपराजधानीतील ११ वरिष्ठ डॉक्टरांनी पुढाकार घेतला आहे. भाजप वैद्यकीय आघाडीच्या प्रयत्नामुळे या सर्व डॉक्टरांनी आज मंगळवारी या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला औषधांसह सर्व उपचार नि:शुल्क देण्याची घोषणा केली.

लोणार तालुक्यातील चोरपांग्रा गावातील नितीन राठोड आणि मलकापूर (बोदवड) येथील संजय राजपूत या दोन्ही शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी ही आरोग्यभेट  आहे. ही भेट देणाऱ्यांमध्ये सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अजीज खान, पोटविकार तज्ज्ञ डॉ. श्रीकांत मुकेवार, मेंदू शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गिरी, मधुमेह तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर गिल्लुपकर, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अभिजीत पाटील, मेंदूरोग तज्ज्ञ  डॉ. नीलेश अग्रवाल, बालरोग तज्ज्ञ डॉ. अनिल बडवाईक, जनरल फिजिशियन डॉ. प्रीती मानमोडे, कान-नाक-घसा रोग तज्ज्ञ डॉ. संदीप अग्रवाल, होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. रश्मी शुक्ला, आयुर्वेद व वात रोग तज्ज्ञ डॉ. जी. एम. ममतानी, डॉ. अरविंद हरणे, डॉ. अनिल कनोजे, डॉ. नाना पोजने, डॉ. अनिल गवळी, डॉ. श्याम गोदानी, डॉ. अमर वासनिक यांचा समावेश आहे.

भाजप वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ. उमेश शिंगणे टिळक पत्रकार भवनात झालेल्या पत्रपरिषदेत म्हणाले, देशासाठी आपले जवान जीवाची पर्वा न करता सीमेवर दिवस-रात्र सेवा देत असतात. अतिरेक्यांच्या हल्यात ४० जवान दगावल्यामुळे संपूर्ण जगाला देश या जवानाच्या कुटुंबासोबत उभा असल्याचे दिसायला हवे. सोबत प्रत्येकाने या कुटुंबांच्या मदतीसाठी पुढे यायला हवे. त्या दिशेने एक पाऊल आम्ही टाकले आहे. भविष्यात ही संख्या आणखी वाढणार आहे. लवकरच या दोन्ही कुटुंबांची भेट घेऊन त्यांना या सर्व डॉक्टरांचे क्रमांक दिले जाणार असल्याचेही त्यांनी  सांगितले. याप्रसंगी डॉ. अजीज खान, डॉ. श्रीकांत मुक्केवार, डॉ. अनिल बडवाईक, डॉ. अनिल कनोजे, डॉ. रश्मी शुक्ला, डॉ. जी. एम. ममतानी, डॉ. गिरीश चरडे उपस्थित होते. दरम्यान, जालना रुग्णालयाकडूनही शहिदांच्या कुटुंबीयांच्या उपचाराची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे.