नागपूर : दवाखान्यात घेऊन जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर नेऊन आईचा खून करणाऱ्या मुलाला सत्र न्यायाधीश एम. व्ही. देशपांडे यांनी जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली. संजय मारोती मेश्राम असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरोपी १ मे २०२० रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास आपल्या आईला दवाखान्यात घेऊन जात होता. वाटेत आरोपीने टेकाडी शिवारातील रामटेक नागपूर लोकल रेल्वे लाईनच्या बाजूला उड्डाणपुलाच्या पिल्लरजवळ लाकडी दांड्याने आईच्या डोक्यावर प्रहार केला. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. रेल्वे लाईन पार झाल्यावर तिच्याशी शाब्दिक वाद झाला. त्यामुळे आरोपीने रागाच्या भरात तिचा खून केला. त्यावेळी घटनास्थळी शंकर भोयर, कुणाल नाईक, कैलास पाचघरे, सुनिल ठाकरे उपस्थित होते.

हेही वाचा – वाशीम जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपीट, अवकाळी पावसाचा तडाखा

या घटनेची माहिती टेकाडी पोलीस पाटील पुंडलिक पुरडकर यांनी कन्हान पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळीच आरोपीला अटक केली. पुराव्याच्या आधारावर सत्र न्यायाधीश एम. व्ही. देशपांडे यांनी आरोपीला जन्मठेप ठोठावली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Life sentence for son who murder his mother dag 87 ssb