वर्धा : सावंगी येथील मेघे विद्यापीठाच्या यावर्षीच्या गणेशोत्सवात विविध उपक्रम होत असून ‘जी-२०’ परिषदेप्रमाणे करण्यात आलेली रोषणाई हे मुख्य आकर्षण ठरले आहे. नेहमीप्रमाणे होणाऱ्या रोषणाईत यावेळी बदल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सावंगी येथील गणेशोत्सव विविध उपक्रमांमुळे विदर्भभर चर्चेत असतो. येथील रोषणाई पाहण्यासाठी दूरवरून गणेशभक्त लोटतात. यावेळी ज्ञानविज्ञान प्रदर्शनी, मनमोहक सजावट, सप्तरंगी कारंजे दर्शकांना भुरळ पाडणारे आहे. तसेच प्रश्नमंजुषा, बॉडी पेटींग, पाककृती, ट्रेझरहंट, ई-स्पोर्ट्स व अन्य स्पर्धांचे आयोजन होत आहे.

हेही वाचा – पश्चिम बंगाल, ओडिशाजवळ कमी दाबाचा पट्टा, राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

सायंकालीन सत्रात विविध प्रांतातील लोककला, संगीतरजनी, गुरुकुल, नृत्य, नाटिका सादर होतील. २३ सप्टेंबरला स्वरवैदर्भी गायन स्पर्धा तर २४ तारखेला जलसा महोत्सव होत आहे. या निमित्ताने आयोजीत पत्रपरिषदेत बोलताना कुलपती दत्ता मेघे म्हणाले की गत चार दशकांपासून परिश्रमाने उभी झालेली ही संस्था लोकांच्या भल्यासाठी कार्यरत राहील. गत पाच दिवसांत तीन रुग्णांच्या अवयवदानातून झालेल्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमुळे १६ लोकांना नवजीवन प्राप्त झाल्याची माहिती विशेष अधिकारी डॉ. उदय मेघे यांनी दिली. प्रशासकीय महासंचालक डॉ. राजीव बोरले यांनी उपक्रमांची माहिती दिली.

अधिष्ठाता डॉ. अभय गायधने यांनी विद्यापीठातील संशोधनाबाबत तर वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर यांनी रोबोटिक सर्जरीची माहिती दिली. दीड वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेल्या सिद्धार्थ गुप्ता स्मृती कर्करोग रुग्णालयात आतापर्यंत १६ हजारांवर कर्करुग्णांवर उपचार झाल्याची माहिती संचालक डॉ. नितीन भोला यांनी दिली. महोत्सवाचा शुभारंभ दत्ता मेघे व शालिनीताई मेघे यांच्या उपस्थितीत श्री गणेशाच्या स्थापनेने करण्यात आला.

हेही वाचा – सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एक लाख हेक्टरी मदत द्या, आमदार प्रतिभा धानोरकर यांची मागणी

यावेळी जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर, सांस्कृतिक संयोजक डॉ. आशिष अंजनकर, डॉ.रुपाली नाईक, डॉ. विठ्ठल शिंदे यांनी आगामी दहा दिवसांत आयोजीत शंभरावर आरोग्य शिबिरांची वैशिष्ट्ये सांगितली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lighting like g20 conference in sawangi ganesh utsav pmd 64 ssb