लोकसत्ता टीम

अमरावती: काही दिवसांपूर्वी चिखलदरा पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील काटकुंभ येथे एका घरातून जप्‍त करण्‍यात आलेला अवैध मद्यसाठा हा बनावट असल्‍याचा अहवाल प्राप्‍त झाला असून हे बनावट दारू तयार करणाऱ्या आंतरराज्‍यीय टोळीचे कृत्‍य असल्‍याचा पोलिसांचा संशय आहे. या टोळीला हुडकून काढण्‍याचे आव्‍हान पोलीस यंत्रणेसमोर आहे.

thief escapes police custody
पोलीस दरोडेखोराला घेऊन ‘स्पा’मध्ये गेले, ‘मसाज’चा आनंद लुटत असताना चोर झाला पसार
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांचा मोठा खुलासा, “त्यादिवशी आरोपी आणि एपीआयचं चहाचं बिल मीच दिलं, त्यानंतर त्याने…”
Police detained three Bangladeshis living illegally in Bhiwandi for 15 years
भिवंडीतून तीन बांगलादेशींना ताब्यात, बनावट आधारकार्डासह शिधापत्रिका, पॅनकार्ड जप्त
rain of money through superstition and witchcraft in patur forest
अंधश्रद्धा व जादूटोण्यातून पैशांचा कथित पाऊस… पातूरच्या जंगलात नेमकं घडलं काय?
pcmc issue seized notice to Hotels hospitals schools and educational institutions over property tax arrears
पिंपरी : थकबाकी असलेले हॉटेल, रुग्णालय, शाळा होणार जप्त
municipal corporation has drawn up rules for developers to prevent air pollution during construction in city
ठाण्यातील विकासकांना काम थांबविण्याचे आदेश, हवा प्रदूषण रोखण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पालिकेची कारवाई
young man kills grandmother for greed for money in raigad
पैशाच्या लोभातून नातवानेच आजीचा खून केला

गेल्‍या ९ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चिखलदरा हद्दीत गस्‍त घालत असताना काटकुंभ येथे एका घरात अवैध दारूसाठा असल्‍याची गोपनीय माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. पोलिसांनी आरोपी विनोद शंकरलाल मालविय (४५) आणि प्रमोद शंकरलाल मालविय (४८) यांच्‍या घरी छापा टाकला. रुन आरोपीचे ताब्यातून ३८ हजार ८०० रुपये किमतीची विदेशी दारू आणि ९ लाख ८० हजार रुपयांची देशी दारू असा १० लाख १८ हजार रुपयांचा दारूसाठा पोलिसांनी जप्‍त केला होता. घटनेच्या दिवशी यातील आरोपी प्रमोद मालविय हा फरार झाला होता. पोलीस पथकाने त्‍याला काल अटक केली.

आणखी वाचा-अकोला : पोलीस तपासात धक्कादायक प्रकार उघडकीस; आई सतत रागवत, ओरडत असल्याने अल्पवयीन मुलाने…

पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. सहायक पोलीस निरीक्षक हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. दरम्‍यान जप्त दारु साठयाविषयी संशय निर्माण झाल्याने शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, शिंगणापूर, ता. कोपरगाव जि. अहमदनगर तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्‍या अधीक्षकांकडून अहवाल मागविण्‍यात आला. ही दारू त्यांच्‍या कारखान्यात तयार झालेली नसून बाटलीचे सील आणि लेबल बनावट आहे. तसेच दारू मध्ये वापरण्यात आलेले रसायन हे सुध्दा त्यांचे कारखान्यात वापरण्यात येत नसून बाटलीवर देण्यात आलेला बॅच नंबरसुध्दा बनावट असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने सदर बॅच असलेल्या मद्याचे अमरावती जिल्ह्यात कुठेच वितरण झाले नसल्याचा अहवाल दिला आहे. हा दारूसाठा बनावट असल्याचे निष्‍पन्‍न झाले आहे. हा दारूसाठा कुठे तयार करण्यात आला.

गुन्ह्यात इतर आरोपी कोण-कोण आहेत, अशा प्रकारची दारू आणखी कुठे वितरीत करण्यात आली आहे याचा तपास करण्यात येत आहे. या प्रकरणी बनावट दारू निर्मिती व विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय मोठया टोळीचे कृत्‍य उघड होण्‍याची शक्‍यता आहे.

Story img Loader