लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अमरावती: काही दिवसांपूर्वी चिखलदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काटकुंभ येथे एका घरातून जप्त करण्यात आलेला अवैध मद्यसाठा हा बनावट असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून हे बनावट दारू तयार करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचे कृत्य असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या टोळीला हुडकून काढण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर आहे.
गेल्या ९ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चिखलदरा हद्दीत गस्त घालत असताना काटकुंभ येथे एका घरात अवैध दारूसाठा असल्याची गोपनीय माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. पोलिसांनी आरोपी विनोद शंकरलाल मालविय (४५) आणि प्रमोद शंकरलाल मालविय (४८) यांच्या घरी छापा टाकला. रुन आरोपीचे ताब्यातून ३८ हजार ८०० रुपये किमतीची विदेशी दारू आणि ९ लाख ८० हजार रुपयांची देशी दारू असा १० लाख १८ हजार रुपयांचा दारूसाठा पोलिसांनी जप्त केला होता. घटनेच्या दिवशी यातील आरोपी प्रमोद मालविय हा फरार झाला होता. पोलीस पथकाने त्याला काल अटक केली.
आणखी वाचा-अकोला : पोलीस तपासात धक्कादायक प्रकार उघडकीस; आई सतत रागवत, ओरडत असल्याने अल्पवयीन मुलाने…
पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. सहायक पोलीस निरीक्षक हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. दरम्यान जप्त दारु साठयाविषयी संशय निर्माण झाल्याने शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, शिंगणापूर, ता. कोपरगाव जि. अहमदनगर तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांकडून अहवाल मागविण्यात आला. ही दारू त्यांच्या कारखान्यात तयार झालेली नसून बाटलीचे सील आणि लेबल बनावट आहे. तसेच दारू मध्ये वापरण्यात आलेले रसायन हे सुध्दा त्यांचे कारखान्यात वापरण्यात येत नसून बाटलीवर देण्यात आलेला बॅच नंबरसुध्दा बनावट असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने सदर बॅच असलेल्या मद्याचे अमरावती जिल्ह्यात कुठेच वितरण झाले नसल्याचा अहवाल दिला आहे. हा दारूसाठा बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा दारूसाठा कुठे तयार करण्यात आला.
गुन्ह्यात इतर आरोपी कोण-कोण आहेत, अशा प्रकारची दारू आणखी कुठे वितरीत करण्यात आली आहे याचा तपास करण्यात येत आहे. या प्रकरणी बनावट दारू निर्मिती व विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय मोठया टोळीचे कृत्य उघड होण्याची शक्यता आहे.