चंद्रशेखर बोबडे
नागपूर: भारतीय विज्ञान परिषदेसाठी (इंडियन सायन्स काँग्रेस) देश-विदेशातून आलेल्या प्रतिनिधींना नागपूर व विदर्भातील प्रमुख स्थळांची माहिती व्हावी, त्यांनी तेथे भेटी द्याव्यात यासाठी आयोजकांनी जी स्थळे निवडली आहेत. त्यात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुख्यालय, हेडगेवार स्मृती मंदिरासह अनेक मंदिरे, पर्यटन स्थळांचा समावेश आहे. मात्र कधीकाळी भारतीय स्वांतत्र चळवळीचे प्रमुख केंद्र राहिलेल्या महात्मा गांधी यांचे सेवाग्राम व भूदान चळवळीच्या माध्यमातून भूमिहिनांना भूस्वामी करण्याचा आगळा वेगळा प्रयोग भारतात यशस्वी करणारे आचार्य विनोबा भावे यांच्या पवनार या दोन स्थळांचा समावेश नाही.
विशेष म्हणजे ही दोन्ही स्थळे नागपूरपासून १०० किलोमीटर अंतरावर महामार्गालगत आहेत, दुसरीकडे अंजिठा-वेरूळ व गडचिरोलीतील मार्कंडा ही शेकडो किलोमीटर दूर अंतरावरील स्थळांचा यादीत समावेश आहे. १०८ वी भारतीय विज्ञान परिषद (इंडियन सायन्स काँग्रेस ) सध्या नागपुरात सुरू आहे. यात्यासाठी देश-विदेशातून हजारो प्रतिनिधी दाखल झाले आहेत. चार दिवस चालणाऱ्या या परिषदेत विविध वैज्ञानिक व सामाजिक विषयांवर चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत. विविध ठिकाणांहून नागपुरात आलेल्या प्रतिनिधींना नागपूर, विदर्भातील पौराणिक, ऐतेहासिक स्थळांसह नैसर्गिक सौंदयाची माहिती मिळावी म्हणून त्यांनी कुठल्या स्थळांना भेटी द्याव्यात यासाठी आयोजकांनी प्रमुख स्थळांची निवड केली आहे.
भारतीय विज्ञान परिषद असोसिएशनच्या संकेतस्थळावर आणि माहिती पत्रिकेत याची माहिती देण्यात आली आहे. या स्थळांना भेटी देणे हे ऐच्छिक आहे, त्यासाठी एक दिवसांपासून सहा दिवसांपर्यंत टूर पॅकेजेस तयार करण्यात आले असून ते सशुल्क आहेत. भेटीसाठी जी स्थळे निवडली आहेत त्यात स्थानिक पातळीवरील शहरांमध्ये संघ मुख्यालय, हेडगेवार स्मृती मंदीर, दीक्षाभूमी, ड्रॅगन टेम्पल, रामटेकमधील गडमंदिर, स्वामी नारायण मंदिर, मनसर, कालीदास स्मारक, रामन विज्ञान केंद्र या स्थळांसह जंगल सफारीसाठी पेंच, उमरेड कऱ्हांडला, नवेगाव खैरी, चिखलदरा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे मोझरी, लोणार, मार्कंडा, मराठवाड्यातील अजिंठावेरूळ आदी स्थळांचासमावेश आहे.
या प्रमुख स्थळांच्यायादीत भारताच्या स्वांतत्र चळवळीच्याकाळात देशाचे केंद्रबिंदू असणाऱ्या महात्मा गांधी यांच्या सेवाग्रामचा आणि भूमिहिनांना भूदान चळवळीच्या माध्यमातून भूमिहिनांना जमीन देण्याचा एक आगळावेगळा प्रयोग देशात यशस्वी करणाऱ्या आचार्य विनोबा भावे यांच्या पवनार या दोन प्रमुख स्थळांचासमावेश नाही, याबाद्दलअनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. पूर्वी विदेशातून येणाऱ्या पाहुण्यांना जी देशाविषयी माहितीदिलीजात होती त्यात सेवाग्राम वपवनारचा उल्लेख असायचा. आजही सेवाग्राम व पवनारला भेट देणाऱ्यांमध्येविदेशी पर्यटक,अभ्यासक येतात. महात्मा गांधी यांच्या विचाराविषयी आस्था असणाऱ्यांची संख्या विदेशात अधिक आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय विज्ञान परिषदेने निवडलेल्या स्थळामध्ये सेवाग्रामव पवनार नसणे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.