लोकसत्ता टीम

नागपूर : आईवडिलांसह लग्नात आलेला पाच वर्षीय चिमुकला रस्त्यावर धावत आला. भरधाव जात असलेल्या कारने त्याला जबर धडक दिली. या धडकेत चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री साडेनऊ वाजता वेळाहरी-बेसा रोडवर घडली. चिरायू अनोद पवार (रा. राजीवनगर, वडधामना) असे अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
delivery boy
“डिलिव्हरी बॉयचा संघर्ष कधीच कुणाला दिसत नाही!” VIDEO होतोय व्हायरल; नेटकरी म्हणाले ” डिलिव्हरी बॉयचा आदर करा”
dance video on Tambdi chamdi chamakte unat laka laka song
‘तांबडी चामडी चमकते उन्हात लका लक’ तरुणाने साध्या-भोळ्या आईबरोबर केला जबरदस्त डान्स, Video एकदा पाहाच
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कमी वयात होतात श्रीमंत, कमावतात आयुष्यात भरपूर धन-संपत्ती
Boy killed in gas cylinder blast karad
गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटामध्ये मुलगा ठार; उंडाळेतील भीषण दुर्घटना

अनोद पवार हे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत नोकरीला आहेत. त्यांना लक्ष्य (८) आणि चिरायू (५) ही दोन मुले आहेत. शनिवारी त्यांच्या नातेवाईकांच्या मुलाचे लग्न होते. त्या लग्नात पवार कुटुंब सहपरीवार आले होते. रविवारी नवदाम्पत्याचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यासाठी बेळाहरी-बेसा रस्त्यावरील करण लॉनमध्ये समारंभात पवार कुटुंब गेले होते. रविवारी रात्री साडेनऊ वाजता लक्ष्य आणि चिरायू हे खेळत असताना त्यांची मावशी घरी जाण्यासाठी निघाली. त्यामुळे दोघेही मावशीला सोडण्यासाठी रस्त्यापर्यंत गेले. मात्र, चिरायू मावशीकडे जाण्यासाठी धावत निघाला. रस्त्यावरून भरधाव कार जात होती. अचानक मुलगा रस्त्यावर आडवा आल्यामुळे कारखाली चिरडल्या गेला.

आणखी वाचा-नागपूर विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

कारचालकाने करकरचून ब्रेक दाबले. मात्र, चिरायूच्या पोटावरून कार गेल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या प्रकरणी हुडकेश्वरचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नकाते यांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. लगेच कारचालक योगेश दामोदर मोहाडीकर (४२, शिव एलाईट टाऊनशिप, शंकरनगर) याला अटक केली.

पवार कुटुंबातील पाच वर्षीय चिमुकला चिरायू याला कारने चिरडल्याची वार्ता लग्न मंडपात पोहचली. त्यामुळे नातेवाईकांनी रस्त्यावर धाव घेतली. कारचालकाशी वाद घालून कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वातावरण तापले होते. रस्त्यावर तणाव निर्माण झाला. चिरायूच्या मृत्यूनंतर लग्नात शोककळा पसरली. हुडकेश्वर पोलिसांनी वेळीच पोहचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे अनर्थ टळला.