लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: एका तीन वर्षीय मुलावर भटक्या श्वानांनी अचानक हल्ला करीत त्याला गंभीर जखमी केले. मात्र, तेवढ्यात मुलाच्या आईने धाव घेतल्यामुळे मोठी हानी टळली. ही घटना वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनमोल नगरात घडली. डुग्गू दुबे असे जखमी चिमुकल्याचे नाव आहे. कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली असून सध्या समाजमाध्यमांवर चांगलीच प्रसारित होत आहे.

आणखी वाचा- धक्कादायक! करोनासह इन्फ्लूएन्झा, गोवरमुळे नागरिक बेजार

बुधवारी दुपारी अनमोलनगरातील शिवाजी पार्कजवळून डुग्गू दुबे हा पायी जात होता. त्याच्यावर पाच ते सहा भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. त्याला ओढत काही अंतरावर नेले. त्यादरम्यान डुग्गूच्या आईचे लक्ष मुलाकडे गेले. ती धावतच तेथे आली. तिने दगडाने कुत्र्यांना हाकलून लावले. या घटनेमुळे खळबळ उडाली. भटक्या कुत्र्यांचा वावर सध्या वाढत असून याबाबत महापालिका प्रशासन गंभीर नसल्यामुळे अशा घटना रोजच घटत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Little boy seriously injured in an attack by stray dogs adk 83 mrj
Show comments