चंद्रपूर : चांदा आयुध निर्माणी परिसरात रान मांजराची शिकार मादी बिबट्याने केली. शिकार तोंडात पकडून ओढत नेत असताना लहानग्या बिबट्याचा शिकार न सोडण्याचा हट्टीपणा कॅमेऱ्यात कैद झाला. सध्या ही चित्रफीत समाज माध्यमावर खूप पाहिली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/05/WhatsApp-Video-2023-05-21-at-7.56.58-PM.mp4

हेही वाचा – बुलढाणा : भाजपा प्रदेश पदाधिकाऱ्याची ‘स्कॉर्पिओ’ जाळली!

भद्रावती येथील चांदा आयुध निर्माण वसाहत परिसरातील जंगलात एका रस्त्यावर बिबट्याचे कुटुंब बसले होते. यापैकी मादी बिबट्याने रानमांजराची शिकार केली. ही शिकार मादी बिबट तोंडात पकडून इतरत्र घेऊन जात असताना तिचे छोटे पिल्लू शिकार तोंडातून सोडायला तयार नव्हते.