चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील बसस्थानकासमोरील भगवती कलेक्शन समोर जिवंत बॉम्ब आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बॉम्ब असल्याची माहिती गडचांदूर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान गडचांदूर पोलिस व बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल होत बॉम्ब सदृश्य बॅगची तपासणी सुरू केली आहे. गडचिरोली पोलिस दलाचे बॉम्बविरोधी पथक गडचांदूरसाठी रवाना झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंगळवारी दुपारी २.५० वाजताच्या सुमारास बसस्थानक परिसरात असलेल्या भगती कलेक्शन समोर एका बँगेत दोन वायर जोडलेले जिवंत बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली. बॉम्ब असल्याची वार्ता गडचांदूर शहरात पसरताच नागरिकांनी परिसरात मोठी गर्दी केली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तगडा पोलिस बंदोबस्तासह बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. बॉम्बची तपासणी करण्यात येत आहे.

हेही वाचा…सोन्याच्या दर पुन्हा चढतीवर, हे आहेत आजचे दर…

दरम्यान, बॉम्ब निकामी करण्यासाठी गडचिरोली पोलिस दलाचे बॉम्बविरोधी पथक गडचांदूरकडे रवाना झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ही बॉम्ब सदृश्य बॅग कोण ठेवली याचा कसून शोध गडचांदूर पोलिस घेत आहे. वृत्तलिहेतोवर बॉम्ब निकामी करण्यात आला नव्हता.

हेही वाचा…झारखंडमध्ये रेल्वे अपघात, नागपूरमार्गे धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलले

गडचिरोली येथून बॉम्ब निकामी करणारे पथक रवाना

यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना विचारले असता दुकानात दोन पिशव्या मिळाल्या. त्यात संशयास्पद वस्तू आहे. बॉम्ब असल्याची चर्चा आहे. संबंधित दुकानदाराला बॉम्ब असल्याचा फोन देखील आला होता. त्यामुळे गडचिरोली येथून बॉम्ब निकामी करणारे पथक पाचारण केले आहे. हे पथकच संबंधित वस्तू बॉम्ब आहे की अन्य काही हे सांगू शकेल. बॉम्ब असल्याची चर्चा गावात वाऱ्यासारखी पसरल्याने लोकांनी गर्दी केली आहे. लोकांनी शांत राहावे असेही आवाहन पोलिस अधीक्षक यांनी केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Live bomb found in chandrapur near gadchandur bus stand bomb disposal squad deployed rsj 74 psg