भंडारा : मुलीच्या साक्षगंधाच्या कार्यक्रमात तयार करण्यात आलेल्या भाजीत पाल पडली होती. ती भाजी ग्रामस्थांनी खाल्ल्याने तब्बल ५१ जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना जांभोरा गावात घडली. या घटनेनंतर भंडाऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, भंडाऱ्याच्या जांभोरा गावातील राजकुमार गहाणे यांच्या घरी २२ सप्टेंबर रोजी मुलीच्या साक्षगंधाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या दरम्यान तयार करण्यात आलेल्या भाजीमध्ये पाल पडली. मात्र याबाबत कल्पना नसल्याने ती गावकऱ्यांना जेवणात वाढण्यात आली. साक्षगंध कार्यक्रम पार पडल्यानंतर आलेले सर्व पाहुणे जेवण करून गावाकडे गेले. परंतु गावातील नागरिक सायंकाळच्या दरम्यान जेवण करुन आपल्या घरी गेले असतांनासुद्धा विषबाधा झाल्याचा प्रकार दिसून आला नाही. काहींना थोडा त्रास होऊ लागल्याने खाजगी रुग्णालयात उपचार केला. दोन दिवसांनंतर बहुतेक नागकिरांना हगवण, उलटीचा त्रास होऊ लागल्याने गावात चर्चा होऊ लागली. तर २४ सप्टेंबरला बहुतेक महिला- पुरुषांना पोटदुखी, उलटीचा त्रास जाणवू लागल्याने आरोग्य अधिकारी निषा पांडे व डॉ. सोनवणे यांना माहिती दिली असता जांभोरा येथील आरोग्य उपकेंद्रामध्ये कॅम्प लावण्यात आले.

हेही वाचा – वीज निर्मिती प्रकल्पावरून सरकार व पर्यावरणवाद्यांमध्ये जुंपणार, ‘हे’ आहे कारण

पन्नासच्या जवळपास नागरिकांचे औषधोपचार करण्यात आले. एक रुग्ण शिरीष चंद्रभान गहाणे (वय १७) या मुलाचा शासकीय रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले असून ३६ रुग्णांची आरोग्य अधिकारी डॉ. निषा पांडे, डॉ. सोनवाने, आरोग्य सेविका स्वाती मरस्कोले यांनी औषध उपचार केले असल्याने सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मात्र विषबाधा कशामुळे झाली याचे अद्याप कारण कळू शकले नाही.

हेही वाचा – मुनगंटीवार म्हणतात, जंगलातील वाघांना स्थलांतरित करा..

जांभोरा गावात ५१ जणांना अन्नातून विषबाधा

ही भाजी खाल्ल्यानं ५१ ग्रामस्थांना विषबाधा झाल्याची घटना घडली. रात्री अनेकांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने दहा ते बारा ग्रामस्थांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, उर्वरित नागरिकांवर करडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर काहींवर जांभोरा येथील उपकेंद्रात उपचार करण्यात येत आहे.