नागपूर: कर्ज थकल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी लिलावात काढण्याचा निर्णय आम्ही हाणून पाडू व जे या जमिनी लिलावात घेतील त्यांचे हातपाय तोडू, असा इशारा माजी मंत्री बच्चू कडू यांनी नागपुरात दिला. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनी लिलावात काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर मंगळरी अंमलबजावणी होणार होती. त्यावर कडू यांच्या प्रहार संघटनेने आक्षेप घेत आंदोलन केले. त्यावेळी कडू यांनी वरील इशारा दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loan of farmers land at the auction bacchu kadu cwb 76 ysh