लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चंद्रपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी तयार राहा, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत येऊन आमदारांना दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तीन ते चार महिन्यात पालिका निवडणुका होतील, कामाला लागा, असा मंत्र दिला. यामुळे भाजप नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सदस्य मोहिमेच्या माध्यमातून मोर्चेबांधणीत व्यस्त आहेत, तर काँग्रेस मात्र सुस्तच असल्याचे चित्र येथे दिसून येत आहे. प्रदेश काँग्रेसकडून कार्यक्रम आल्यानंतर, तो आम्ही राबवू, असे जिल्हा व शहर काँग्रेसचे म्हणणे आहे.

लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतरही काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागला. जिल्ह्यातील सहापैकी केवळ ब्रम्हपुरीत विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे एकमेव आमदार निवडून आले. निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये पराभूत मानसिकता खोलवर रुजल्याचे चित्र आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका, नगरपालिका तथा जिल्हा परिषदेत जाणे काँग्रेसच्या नेत्यांनी कधीचेच बंद केले. आता आंदोलनाचीही हिम्मत नेत्यांमध्ये राहिली नाही, असे जाणवते.

आणखी वाचा-वन पर्यटनात नियम मोडल्यास २५ हजारांपर्यंतचा दंड

जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी पराभवाची समीक्षा करण्यासाठी एक बैठक घेतली. त्यानंतर दुसरी बैठक घेण्याची हिंमत त्यांनी दाखवली नाही. ते आपल्या राजुरा मतदारसंघाच्या बाहेर पडतच नाहीत. शहराध्यक्ष रामू तिवारी यांनी अद्यापही आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केलेली नाही. आमदार वडेट्टीवार यांचे जिल्हा मुख्यालयी म्हणजेच चंद्रपुरात येणे कमी झाले आहे. खासदार प्रतिभा धानोरकर चंद्रपुरात येतात, मात्र एकाच गोतावळ्यात त्यांची उठबस आहे. काँग्रेसचे एक-दोन पराभूत उमेदवार वगळता इतरांना पक्षाशी काही देणे-घेणे नाही, असेच चित्र आहे. बोटावर मोजण्याइतके माजी नगरसेवक त्यांच्या प्रभागात सक्रिय असून इतर सुस्त आहेत.

नेत्यांनी पुढाकार घेण्याची गरज

ही स्थिती पाहता काँग्रेसचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत टिकाव लागेल का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. आगामी निवडणुका जिंकायच्या असेल तर जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांना पुढाकार घ्यावा लागेल. नेत्यांना सर्वप्रथम पराभूत मानसिकता झटकावी लागेल. पक्षात आलेली मरगळ, निरूत्साह दूर करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवावा लागेल. मात्र, वरिष्ठ नेत्यांकडून असे काहीही होताना दिसत नाही.

आणखी वाचा-चंद्रपुरात ४८ तासांत आणखी एका वाघाचा मृत्यू; ताडोबा बफरमधील…

भाजपची सदस्यता मोहीम जोमात

याउलट भाजप स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीला जोमाने लागला आहे. सदस्यता मोहीम जोरात सुरू आहे. भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते सर्वच प्रभागात दिसून येतात. आमदारही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बळ देताना दिसतात. विविध कार्यक्रमांचे आयोजन करून भाजप लोकप्रतिनिधी जनतेच्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यामुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.