नागपूर : वाघांची संख्या वाढत असली तरीही जंगलक्षेत्र त्यांना कमी पडत असल्याने अधिवास आणि अस्तित्त्वाच्या लढाईसाठी वाघांमध्ये झुंज देखील पाहायला मिळते. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाने वाघांच्या अशा अनेक झुंजी अनुभवल्या आहेत. मात्र, आता इतरत्र देखील वाघांची संख्या वाढल्यामुळे वाघांमध्ये लढाई होण्याचा प्रकार सुरू झाला आहे. नागभिड वनपरिक्षेत्रालगतच्या ग्रामस्थांनी दोन वाघांमधील झुंजीचा थरार अनुभवला खरा, पण आता हे दोन वाघच वनखात्याला गवसलेले नाहीत.

नागभिड वनपरिक्षेत्रातील वासाडा मक्ता परिसरात स्थानिक ग्रामस्थांनी दोन वाघांमधील झुंजीचा थरार अनुभवला. या गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार दोन वाघांमध्ये जोरदार झुंज झाली. परिणामी, एक वाघ यात गंभीररित्या जखमी झाला. घटनास्थळावर अक्षरश: रक्ताचा सडा पडलेला होता. ग्रामस्थांनी लागलीच या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवली. मात्र, वनविभागाची चमू पोहचेपर्यंत हे दोन्ही वाघ याठिकाणाहून बेपत्ता झाले. वनविभागाची चमू घटनास्थळी पोहोचली तेव्हा यापरिसरात मोठ्या प्रमाणावर रक्त सांडले होते. यानंतर जखमी वाघाचा शोध घेण्यासाठी वनविभागाच्या चमुने या परिसरात शोध मोहीम सुरू केली. वाघ जखमी असल्याने परिसरातील लोकांच्या जिविताला देखील धोका निर्माण झाला आहे. कारण जखमी वाघ हल्ला करण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी वाघाच्या मागे जाऊ नये किंवा जंगलात प्रवेश करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

tiger attack speeding bike Pimpalgaon Lakhni Taluka bhandara two injured
भंडारा : रात्रीचा थरार! वेगाने जाणाऱ्या दुचाकीवर अचानक वाघाने घेतली झेप…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Tipeshwar sanctuary hunters noose stuck around neck of tigress named PC
वाघिणीच्या गळ्यात अडकला शिकारीचा फास, वाघांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
Cowherd died , tiger attack, Chandrapur,
चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
Bhandara District, Sarpewada , Tiger, citizens crowd,
VIDEO : नरभक्षक वाघ दिसताच नागरिकांचा गोंधळ, सुरक्षा उपायांची…
Bahelia hunter, tiger, tiger hunt Maharashtra,
महाराष्ट्रातील वाघ बहेलियांच्या रडारवर! राज्याला “रेड अलर्ट” !
tigers death loksatta article
अन्वयार्थ : वाघांच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची?
Maharashtra Two Tiger Death, Tiger Death, pench ,
राज्यात एकाच दिवशी दोन वाघांचा मृत्यू

हेही वाचा…मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवडणूक विजयाला न्यायालयात आव्हान…ईव्हीएममुळे…

मानवी जीवितास कोणताही धोका निर्माण होऊ नये आणि जखमी वाघाला लवकरात लवकर जेरबंद करुन त्याच्यावर उपचार करता यावे म्हणून वनविभागाने शोधमोहीम सुरू केली आहे. नागभीड वन परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ७५६ मध्ये ही घटना घडली. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या झुंजीतील एक वाघ गंभीररित्या जखमी झाला आहे. परिसरातील रक्ताच्या सड्यावरुनच हे स्पष्ट होत आहे. यापूर्वीदेखील पेंच व्याघ्रप्रकल्पात एका जखमी वाघाला शोधण्यासाठी मोहीम राबवली असता या जखमी वाघाने मोहीमेतील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर हल्ला केला होता. यात ते अधिकारी गंभीररित्या जखमी झाले होते. तर ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातच दोन वाघाच्या झुंजीत एका वाघाला जीव गमवावा लागला होता. या व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातही वाघांची संख्या वाढल्याने याठिकाणी देखील वाघाच्या झुंजी झाल्या आहेत. साधारण वयात आलेला वाघ आणि प्रस्थापित वाघांमध्ये अधिवास आणि अस्तित्वावरुन या लढाया होत आहेत.

Story img Loader