नागपूर : दिवंगत बाबा आमटे व दिवंगत साधना आमटे यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातील सोमनाथ प्रकल्पात भारतभरातील युवकांसाठी १९६८ पासून आंतर-भारती श्रमसंस्कार शिबीर आयोजित करण्यात येते. यावर्षी गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प १५ ते २२ मे या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या ५६ वर्षांपासून हे श्रमसंस्कार शिबीर अव्याहत सुरू आहे. देशभरातील अनेक तरुण या शिबिराने प्रेरित झाले आहे. या शिबिराने देशाला अनेक सामाजिक कार्यकर्ते दिले आहेत. देशाच्या विविध भागात विविध उपेक्षीत घटकांसाठी या शिबिरातून तयार झालेली कार्यकर्ते मंडळी अतिशय मोलाचे सामाजिक कार्य करीत आहे.

शिबिराच्या निमित्ताने सहभागी होणाऱ्या सर्वांना डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे तसेच प्रकल्पातील सर्व कार्यकर्त्यांचे लोकबिरादरी प्रकल्पामार्फत गेली ५१ वर्ष आदिवासी बांधवांच्या विकासासाठी सुरू असलेले आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि वन्यजीव अनाथालयाचे कार्य जवळून अनुभवण्याची संधी मिळणार आहे. हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात निसर्गरम्य ठिकाणी वसलेला आहे.

शिबिरासाठी वयोमर्यादा १५ ते ४५ असून केवळ २५० शिबिरार्थींना सहभागी होता येणार आहे. प्रवेश ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. संकेतस्थळावर गुगल लिंग लगेच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच अर्ज भरताना अडचण येत असल्याच ईमेल, भ्रमणध्वनीच्या माध्यमातून संपर्क साधता येईल. निवड झालेल्या शिबिरार्थींना ईमेल, भ्रमणध्वनीच्या माध्यमातून कळवण्यात येईल.

अर्ज करण्याची अंतिम तारीखख़५ मार्च आहे. नोंदणीसाठी ‘https://forms.gle/8UmSZJbamrzYTd7V7‘ या संकेतस्थळावर संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी सचिन मुक्कावार (७५८८७७२८५८), दीपक सुतार (८२७५०४७१९२) यांच्याशी किंवा ईमेल ‘shramsanskar2025@gmail.com’ किंवा संकेतस्थळ ‘lokbiradariprakalp.org‘ येथे संपर्क साधावा, असे संयोजकांनी कळवले आहे.

विविध कार्यक्रमांचे आयोजन शिबिरात सकाळी श्रमदान निर्मिती, प्रकल्प भेट, आदिवासी संस्कृती, समस्या, संघर्ष समजण्यासाठी गाव भेट, दुपारी विविध सामाजिक विषयांवर मान्यवरांचे बौद्धिक सत्र आणि शिबिरार्थ्यांची चर्चा सत्र, संध्याकाळी मैदानी खेळ आणि रात्री शिबिरार्थ्याचे सांस्कृतिक कार्यक्रम राहणार आहेत.