आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूरसह विदर्भातील कलावंतांना राज्यभरात पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या लोकसत्ता लोकांकिका या स्पर्धेची विभागीय अंतिम फेरी उद्या, बुधवारी सायंटिफिक सभागृहात होणार आहे. हिंदू मुलींच्या शाळेत घेण्यात आलेल्या विभागीय प्राथमिक फेरीत नागपूरसह विदर्भातील तब्बल २९ महाविद्यालये सहभागी झाली होती. त्यातील ५ एकांकिकाअतिशय उत्कृष्ट ठरल्या असून त्यांची विभागीय अंतिम फेरी आज सायंटिफीक सभागृहात सुरू होत आहे. उद्घाटन सकाळी ११.३० वाजता ज्येष्ठ नाटय़ दिग्दर्शक रमेश अंभईकर यांच्या हस्ते होणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokankika last round in nagpur