सारे नव्या वर्षाच्या स्वागतात व्यस्त असताना विदर्भातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र अश्रू दाटले आहेत. हे अश्रू केवळ आर्थिक नुकसान, त्यामुळे होणारी परवड, कुटुंब चालवताना होणारी ओढाताण, याच कारणापुरते मर्यादित नाहीत तर त्याला सरकारकडून होणाऱ्या फसवणुकीची सुद्धा जोड निश्चित आहे. निवडणुका जिंकणे या एकाच निकषाभोवती केंद्रित झालेले सध्याचे राजकारण, साऱ्याच पक्षाचा त्यातला लक्षणीय सहभाग सरकारांना मूळ समस्येपासून कसा दूर नेतो याचे उत्तम उदाहरण म्हणून बळीराजाच्या या विद्यमान दु:खाकडे बघायला हवे. ते नेमके कसे हे आधी समजून घेऊ. यंदा सरकारने कापसाला हमीभाव जाहीर केला सात हजार १२१. हा मध्यम धाग्यासाठीचा तर लांब धाग्यासाठी सात हजार ५२१. विदर्भात होतो लांब धाग्याचा कापूस. प्रत्यक्षात याला बाजारात भाव मिळतोय सात हजार रुपये. पीक बाजारात यायला लागले की व्यापारी भाव पाडतात हा नेहमीचा फंडा. यंदाही हे पाडापाडीचे सत्र सुरू झाले. यात शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सरकारने भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआय) खरेदी केंद्रे सुरू केली. या केंद्रांवर शेतकरी जात नाहीत कारण त्यांना बाजारात जास्त भाव मिळत आहे, असे धडधडीत खोटे विधान सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या काळात केले. प्रत्यक्षात सत्य काय तर या सरकारी केंद्रांवर आठ टक्क्यापेक्षा कमी ओलावा असलेलाच कापूस स्वीकारला जातो. या निकषात अनेक शेतकरी बसत नाहीत म्हणून ते या केंद्राकडे पाठ फिरवतात. हे सत्य दडवून ठेवण्यामागे सरकारचा हेतू काय? राज्यकर्ते शेतकऱ्यांना मूर्ख समजतात की काय?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा