नागपूर : रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि गोरखपुर दरम्यान ८ होळी विशेष ट्रेन चालवणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-गोरखपुर होळी विशेष (८ फेऱ्या) गाडी धावणार आहे. विशेष ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १३ मार्च ते २४ मार्च २०२५ पर्यंत गुरुवार आणि सोमवारी सकाळी १०.२० वाजता सुटेल आणि गोरखपुर येथे दुसऱ्या दिवशी रात्री ८.०० वाजता पोहोचेल.

विशेष ट्रेन गोरखपुर येथून मंगळवार आणि शनिवारी ११ मार्च ते २२ मार्च २०२५ पर्यंत सायंकाळी ७ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ६.५० वाजता पोहोचेल.ही विशेष गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, रानी कमलापति-भोपाळ, बीना, विरांगना लक्ष्मीबाई-झांसी, उरई, गोविन्दपुरी, प्रयागराज, अयोध्या, मनकापुर आणि खलीलाबाद येथे थांबे घेणार आहे. या गाडीला ४ वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, ४ जनरल सेकंड क्लास आणि २ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन राहणार आहे.

महाराष्ट्रात हो‌ळी १३ मार्चला आहे. तर धुलिवंदन १४ मार्चला आहे. या सणासाठी मोठ्या प्रमाणात लोक मूळ गावी जात असतात. त्यामुळे नियमित रेल्वेगाड्यांना गर्दी होते. हे बघून रेल्वेने विशेष गाडीची सोय केली आहे.

Story img Loader