राजेश्वर ठाकरे, लोकसत्ता

नागपूर : गेल्या दोन लोकसभा निवडणुकींचा निकाल बघता भाजपने दक्षिण नागपुरातून आपल्या मतांची टक्केवारी वाढवली असली तरी त्याच वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपच्या उमेदवाराचा निसटता विजय झाला. त्या दोन्ही निवडणुकतील मतांच्या टक्केवारीनुसार ओबीसी आणि दलितबहुल दक्षिण नागपुरात काँग्रेस आणि भाजपला मतांची टक्केवारी वाढवण्याची समान संधी आहे.

BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Who is George Soros
जॉर्ज सोरोस कोण आहेत? भाजपला त्यांच्याविषयी इतका राग का? ते खरेच ‘काँग्रेसमित्र’ आणि ‘भारतशत्रू’ आहेत का?
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
BJP, municipal corporation, Mahavikas Aghadi,
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची महापालिकेची तयारी, महाविकास आघाडीची पराभूत मानसिकता मात्र कायम
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
Vinayak Raut, BJP , former MP Vinayak Raut,
भाजपचे मताधिक्य गुणवत्तेवर नसून चोरी करून, माजी खासदार विनायक राऊत यांची टीका
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल

दक्षिण नागपुरात ओबीसी आणि दलित मतदारच उमदेवारांचे भवितव्य ठरवण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात ओबीसी (कुणबी, तेली) मतदारांची संख्या ५० टक्क्यांच्या जवळपास आहे. सध्या ओबीसी जनगणना, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाचे मुद्दे चर्चेत आहेत. या मुद्यांवर चर्चा होऊ नये, असा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे तर काँग्रेस याच मुद्यांवर भर देत आहे. या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर अनुसूचित जातीचे मतदार (सुमारे १९ ते २० टक्के ) आहेत. तिसऱ्या क्रमांकावर मुस्लीम मतदार (८ ते ९ टक्के) आहेत.

आणखी वाचा-काँग्रेसबरोबर नकली शिवसेना! नरेंद्र मोदी यांची टीका, चंद्रपुरात पंतप्रधानांची पहिली प्रचार सभा

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपला १,१४,९४५ मते तर काँग्रेसने ७१,४२१ मते घेतली होती. यातून ओबीसी मतदार मोठ्या संख्येने भाजपकडे सरकल्याचे दिसून येते. येथे बसपने ५,४७२ मते तर वंचित बहुजन आघाडीने ४,२८२ मिळाली घेतली. त्यापाठापोठ काही महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र चित्र वेगळे राहिले. लोकसभेत ओबीसीकडे झुकलेला मतदार विधानसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसकडे आल्याचे दिसून आले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ८४,३३९ मते (४४.२ टक्के) तर काँग्रेसला ८०,३२६ मते (४२.० टक्के) मिळाली. बसपाने ५,६६८ मते, वंचित बहुजन आघाडीने ५,५८३ मते आणि एका अपक्ष उमेदवाराने ४,६१ मते घेतली होती.

दक्षिण नागपुरात भाजपचा आमदार आहे. या आमदाराने नासुप्रच्या माध्यमातून केलेल्या कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करून जनसंपर्क कायम ठेवला आहे. काँग्रेसचे गेल्या विधानसभेचे उमेदवार देखील विविध उपक्रम, जनआंदोलन करून सातत्याने लोकांच्या संपर्कात आहेत. अशा या ओबीसीबहुल दक्षिण नागपूर मतदारसंघात दोन्ही पक्षांना मताची टक्केवारी वाढवून विजश्री खेचण्याची समान संधी आहे.

आणखी वाचा-प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून वेतनच नाही; तब्बल साडेपाच हजारांवर…

केवळ चार हजार मतांनी काँग्रेसचा पराभव

दक्षिण नागपुरात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला १,१४,९४५ तर काँग्रेसला ७१,४२१ मते प्राप्त झाली होती. बसपाने ५४७२ मते घेतली होती तर वंचित बहुजन आघाडीने ४२८२ मिळाली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ८४,३३९ मते (४४.२ टक्के) मिळाली होती. काँग्रेसने ८०,३२६ मते (४२.० टक्के) प्राप्त केली होती. भाजपचा केवळ चार हजार मतांची विजय झाला होता.

Story img Loader