‘लोकसत्ता’तर्फे आयोजित राज्यस्तरीय लोकांकिका स्पध्रेची मुंबईत होणारी महाअंतिम फेरी कोण गाठणार, याचा फैसला उद्या सोमवारी आयोजित नागपूर विभागीय अंतिम फेरीत होणार आहे. महाअंतिम फेरी गाठायचीच या संकल्पासह पाचही चमूंनी जोरदार तालीम केली आहे.

राज्यस्तरीय लोकांकिकेचा जल्लोष राज्यातील आठ केंद्रावर सुरू असून नागपूर विभागीय अंतिम फेरी उद्या १० डिसेंबरला रंगणार आहे. दोन आणि तीन डिसेंबरला विदर्भातून आलेल्या एकांकिकांमधून पाच एकांकिकांनी विभागीय फेरीत प्रवेश केला. यामध्ये ‘अथांग’, ‘इंक-क्रेडिएबल फेसऑफ’, ‘गटार’, ‘पंचमवेध’ आणि ‘भाजी वांग्याची’ यांचा समावेश आहे. या पाचही एकांकिका १० डिसेंबरला दुपारी १२ वाजता सायंटिफिक सभागृहातील रंगमंचावर भिडणार आहेत. यातील एका एकांकिकेला महाअंतिम फेरीत जाण्याची संधी मिळणार असल्याने पाचही एकांकिकांची जय्यत तयारी सुरू आहे.

सोबतच परफॉर्मन्स कसा होईल, याची धाकधूकही असल्याने कुठेही उणेपणा न ठेवता जास्तीत जास्त चांगले सादरीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

विभागीय फेरी गाठलेल्या पाच एकांकिका

  • इंक-क्रेडिएबल फेसऑफ- वसंत शिक्षणशास्त्र महाविद्यालय
  • अथांग – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ललित कला विभाग
  • गटार – धनवटे नॅशनल महाविद्यालय
  • पंचमवेद – महालक्ष्मी जगदंबा महाविद्यालय
  • भाजी वांग्याची – राष्ट्रीय ज्युनियर महाविद्याल

प्रायोजक

सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत केसरी टूर्स आणि पितांबरी सहप्रायोजित आणि पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सहकार्याने ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेचे टॅलेन्ट हंड पार्टनर आयरिश प्रोडक्शन असून एरेना मल्टीमीडिया हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर आहेत. अस्तित्वच्या सहकार्याने रंगणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेसाठी झी मराठी हे टेलिकास्ट पार्टनर आणि एबीपी माझा हे न्यूज पार्टनर आहेत.