हे नागपूर आहे, गुन्हेपूर आहे की लहान व मोठ्या पडद्यावर मोठ्या चवीने बघितले जाणारे मिर्झापूर! या शहराची ओळख राज्याच्या गृहमंत्र्यांचे शहर अशी. ती पुसून टाकण्याचा जणू विडाच येथील गुन्हेगारांनी उचललाय. कधी क्षुल्लक वादातून तर कधी टोळीयुद्धातून येथे मुडद्यावर मुडदे पडताहेत. या शहरात राहणारे लोक गरम रक्ताचे. अगदी वाहनाला किरकोळ खरचटले तरी होणाऱ्या वादाचे पर्यवसान खुनात होते ही पोलिकांकडून नेहमी ऐकवली जाणारी कथा. काही प्रमाणात त्यावर विश्वास जरी ठेवला तरी असे का होते याचे उत्तर कुणालाच शोधावेसे वाटत नाही यावर विश्वास तरी कसा ठेवायचा? मुळात माणसाच्या गुन्हेगारी वृत्तीत वाढ कशी होते? त्याला कोणते घटक कारणीभूत असतात? आर्थिक व सामाजिक पार्श्वभूमीमुळे हे घडते का? गुन्हेगारांवरचा कायद्याचा वचक कमी झाला का? तसे असेल तर त्याला जबाबदार कोण? अशा स्थितीत गुन्हा घडला की लगेच घटनास्थळावर धाव घेणे व तपास करणे एवढीच पोलिसांची भूमिका असते का? यासारख्या प्रश्नांना भिडण्याची धमक येथील यंत्रणा कधी दाखवणार?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा