नागपूर: मान्सून काही काळ विश्रांती घेतो, पण यावेळी मान्सूनने जरा अधिकच विश्रांती घेतली आहे. तब्बल पाच दशकानंतर एवढी मोठी विश्रांती मान्सूनने घेतल्याचे हवामान खात्याने म्हंटले आहे. यापूर्वी १९७२ साली १८ जुलै ते ३ ऑगस्ट पर्यंत मान्सूनने विश्रांती घेतली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जून आणि जुलै महिन्यात बऱ्यापैकी चांगला पाऊस पडला. ज्यामुळे शेतकरी काही प्रमाणात सुखावला. मात्र ऑगस्टमध्ये पावसाने चांगलाच ब्रेक घेतला आहे. त्यामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. मान्सूनची विश्रांती हे सर्वसाधारण आहे. सध्या आठ ते दहा दिवसांची विश्रांती पाऊस घेत आहे. मान्सूनमध्ये अशी विश्रांती येत असते आणि ते शेतीसाठी गरजेचे असते.

हेही वाचा… अजित पवार काकांना वारंवार का भेटतात? वडेट्टीवार यांनी सांगितले कारण

पण यावेळेस पाऊसच कमी पडला. त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता वाटणे साहजिक आहे. दरवर्षीच्या सरासरीपेक्षा यंदा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे मान्सूनची आकडेवारीत मोठा फरक जाणवला आहे. यापूढे पावसाची काही प्रमाणात शक्यता आहे. ही विश्रांती सध्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात आणि पश्चिम विदर्भात बघायला मिळेल. १८ ऑगस्टनंतर मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. १९ आणि २० ऑगस्टला विदर्भात काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Long break of monsoon after almost five decades rgc 76 dvr