नागपूर: गुहागारच्या किनाऱ्यावर उपग्रह टॅग केलेल्या ‘बागेश्री’ या ऑलिव्ह रिडले कासवाने अवघ्या चार महिन्यात श्रीलंकेची किनारपट्टी गाठली आहे. गुहागर ते कन्याकुमारीअसा प्रवास करुन ती श्रीलंकेच्या पाण्यात उतरली आहे.

भारतीय वन्यजीव संस्थेची चमू, मँग्रोव्ह फाउंडेशनचे सदस्य व महाराष्ट्र वनविभागाच्या रत्नागिरी विभागाच्या पथकाने २१ फेब्रुवारीला गुहागर समुद्रकिनाऱ्यावर गस्त घातली. या समुद्रकिनाऱ्यावर घरटी बांधण्यासाठी आलेल्या दोन मादी ऑलिव्ह रिडले कासवांची घरटी बांधून झाल्यानंतर २२ फेब्रुवारीला त्यांना सॅटेलाईट टॅग बसवण्यात आले. ‘बागेश्री’ व ‘गुहा’ अशी नावे देण्यात आलेल्या दोन्ही मादी कासवांना २३ फेब्रुवारीला समुद्रात परत सोडण्यात आले. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची तुरळक घरटी आहेत.

ISRO successfully launches communication satellite NVS 02
‘इस्रो’चे शतकी उड्डाण
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Mahakumbh News Live Updates
Mahakumbh 2025 Stampede : “परिस्थिती नियंत्रणात, पण…”, चेंगराचेंगरीनंतर प्रयागराजमध्ये नेमकी स्थिती काय? मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती!
ISRO satellite launch , Sriharikota, andhra pradesh, 100th successful flight,
ISRO satellite launch mission : इस्रोने श्रीहरीकोटामध्ये ठोकले दमदार शतक, शंभराव्या उड्डाणात ५४८ वा उपग्रह केला प्रक्षेपित
kailash mansaroavr yatra restart
कैलास मानसरोवर यात्रा तब्बल पाच वर्षांनंतर सुरू होणार; या यात्रेचे महत्त्व काय? भारत-चीन संबंध निवळले?
Mahakumbh Mela 2025 Flights Rates
Maha Kumbh 2025 : महाकुंभला जाण्यासाठी विमान तिकिटे स्वस्त होणार? उड्डाण मंत्रालयाची पावले; विमान कंपन्यांना दिल्या सूचना!
Important decisions taken after discussions between Foreign Secretaries of India and China regarding Kailash Mansarovar Yatra
कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू; भारत, चीनच्या परराष्ट्र सचिवांच्या चर्चेनंतर महत्त्वाचे निर्णय
ISS Mahakumbh
Mahakumbh 2025 : लखलखता महाकुंभ! रात्रीच्या अंधारात उजाळून निघालीय गंगा नदी; अंतराळातून काढलेले फोटो तर पाहा!

हेही वाचा… नागपूर: सुपरस्पेशालिटी रुग्णालयात चक्क कोब्रा…

आत्तापर्यंत, ऑलिव्ह रिडले फक्त पूर्व किनारपट्टीवर टॅग केले गेले आहेत. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील ऑलिव्ह रिडलेजचा हा पहिला उपग्रह टॅगिंग प्रकल्प आहे. या अभ्यासामुळे पश्चिम भारताच्या किनाऱ्यावरील ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची हालचाल समजण्यास मदत होईल.

हेही वाचा… नागपूर: ‘समृद्धी’वरील अपघातांची मालिका खंडित करण्यासाठी महिन्‍यातून चार वेळा पाहणी, जनआक्रोशचा निर्धार

सोबतच टॅग करण्यात आलेले ‘गुहा’ हे मादी ऑलिव्ह रिडले कासव लक्षद्वीपपर्यंत जाऊन परत आले आणि आता ते कर्नाटक किनाऱ्याच्या आसपास आहे. मागच्या वर्षी पाच कासवांना उपग्रह टॅग करण्यात आले होते पण ॲागस्ट महिन्यापर्यंत काही तांत्रिक बिघाडामुळे त्यांचे सिग्नल बंद झाले. आता यावर्षी दोन कासवांना लावलेले उपग्रह टॅग जास्तीत जास्त माहिती पोहोचवू शकतील, अशी संशोधकांना अपेक्षा आहे.

Story img Loader