मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील घोषणाबाजीचा धसका
शफी पठाण
श्रोते बाहेर आणि पोलीस आत असे सध्या साहित्य संमेलनाचे चित्र आहे. उदघाटनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान जोरदार घोषणाबाजी झाली होती. त्या दहशतीतून पोलीस अद्याप सावरले नसल्याने त्यांनी संमेलनाला जणू पोलीस छावणी करून टाकले आहे. आज रविवारी सकाळच्या सत्रात एक परिसंवादादरम्यानच उपमुख्यमंत्र्यांचे भाषण होणार आहे.
हेही वाचा >>>नागपूर: यंदाचा अर्थसंकल्प संपूर्ण जगाला दिशादर्शक – मुनगंटीवार
परंतु, पोलिसांनी साहित्यप्रेमींची वाटच अडवून धरली आहे. परिणामी. गांधी विनोबांवरील महत्वाच्या परिसंवादाला श्रोतेच नाही आहेत. श्रोते बाहेर उभे आणि आत खुर्च्या रिकाम्या असे विसंगत चित्र संमेलनाच्या मांडवात दिसत आहे.