अमरावती : दिल्ली येथील श्रद्धा वालकरसह देशात अन्य ठिकाणी झालेल्या हत्याकांड, ‘लव्ह जिहाद’च्या निषेधार्थ तसेच धर्मांतर बंदी कायदा लागू करण्याच्‍या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्‍या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्‍यात आले. यात हजारोच्या संख्येने महिला, मुलींसह विविध हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाल्या होत्या. सदर मोर्चा शहरातील राजकमल चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा काढण्यात आला. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हेही वाचा >>> “फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजेत”, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Jitendra awhad daughter Natasha Awhad
Natasha Awhad: “भाजपाला ही निवडणूक जिंकायचीच होती, कारण…”, जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा खळबळजनक दावा
Anti corruption department filed case against Wangani Sarpanch Vanita Adhav for demanding bribe
लाच मागितल्याने महिला सरपंचावर गुन्हा, बदलापूर जवळच्या वांगणी ग्रामपंचायतीतील प्रकार
Aba Bagul, Parvati Assembly Constituency,
‘बंडखोर’ आबांचे घरवापसीसाठी ‘आर्जव’
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

मोर्चात खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे, भाजपच्‍या जिल्‍हाध्‍यक्ष निवेदिता चौधरी यांच्‍यासह भाजप, विश्‍व हिंदू परिषद, दु्र्गा वाहिनी इत्‍यादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. देशातील सर्व राज्यांमध्ये लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा पारित व्हावा यासाठी आपण लोकसभेत आवाज उचलणार असल्‍याचे नवनीत राणा यांनी सांगितले. कला व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सिनेमातून केली जाणारा हिंदू देवी-देवतांची विटंबना  किंवा हिंदूंच्या धार्मिक भावना दुखविणारे वक्तव्य कदापिही सहन केले जाणार नाही असा इशाराही यावेळी नवनीत राणा यांनी दिला.

हेही वाचा >>> गडचिरोली: नक्षलवाद्यांची आमदारासह प्रशासनाला धमकी; सूरजागड लोहखाण बंद करा अन्यथा…

मागील काही महिन्यात देशातील विविध भागासह हत्याकांडाच्या घटना घडल्या आहेत. या घटनांचा निषेध करण्यासाठी तसेच देशभरात ‘लव्ह जिहाद’च्या घटनांत वाढ झाल्याच्या निषेधार्थ हा आर्कोश मोर्चा काढण्यात आला होता. खोटे बोलून मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे जबरदस्ती धर्मांतर केले जात आहे. धर्मांतराला विरोध करणाऱ्या मुलींच्या हत्या केल्या जात आहेत. हे प्रकार असेच वाढत राहिले तर हिंदूचे अस्तित्व शिल्लक राहणार नाही. त्यामुळे शासनाने देशात लव्ह जिहादविरोधी कायदा व धर्मांतर बंदी कायदा देशात लागू करावा, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले. ‘जय श्रीराम-जय हनुमान’, ‘जो हिंदुत्व की बात करेंगा -वो ही इस देश पर राज करेगा’ अशी घोषणाबाजी यावेळी करण्‍यात आली.

Story img Loader