नागपूर : जम्मू-काश्मीरमधील दहावीत शिकणारी विद्यार्थिनी प्रियकरासोबत नागपुरात पळून आली. रेल्वे स्थानकावर संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. पळून जाऊन लग्न करण्याची कबुली दोघांनीही दिली. पोलिसांनी मुलीला महिला सुधारगृहात पाठवले तर मुलाला ताब्यात घेतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जम्मू काश्मीरमधील १५ वर्षीय मुलगी आणि मुदस्तीर हुसैन मोहम्मद हुसैन (१९, रा. चामोरी, जम्मू काश्मीर) हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनीही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. मुदस्तीरने आपल्या मावशीचा मुलगा हुसैन मोहम्मद शाहीद हुसैन (१९) जम्मूला बोलावले. तेथून तिघेही नागपुरात पळून आले. ते हैदराबादला निघणार होते. परंतु, तिघेही रेल्वस्थानकाबाहेर फिरत होते. त्यांना सीताबर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले.

हेही वाचा : रविकांत तुपकरांची जामिनावर सुटका; म्हणाले, “सत्य परेशान हो सकता हैं पराजित नही”

या प्रकरणी जम्मूतील किस्तवार पोलीस ठाण्यात मुलीच्या आईने मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे. मुदस्तीर आणि प्रेयसी दोघांनीह लग्न करायचे होते. परंतु, तिच्या आईने त्यांच्या प्रेमाला विरोध दर्शविला. त्यामुळे दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याची योजना आखली. हैदराबादमध्ये एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून हुसैन मोहम्मद काम करीत होता. त्याने हैदराबादमधील हॉटेलमध्ये काम मिळवून देण्याचे सांगून प्रेमी युगुलाला पळून जाण्यासाठी मदत केली होती. जम्मू पोलीस प्रेमी युगुलाला ताब्यात घेण्यासाठी नागपुरात येत आहेत. रविवारी तिघांनाही जम्मू पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lovers who escaped from jammu and kashmir are in nagpur police custody adk 83 css