वाशिम: अत्यल्प पाऊस, पिकावर होत असलेला किडीचा प्रादुर्भाव त्यातच जिल्ह्यात लंपीचा आजार पुन्हा सक्रीय झाला आहे. परिणामी अनेक जनावरे दगावण्याची भीती असल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या ग्रामीण भागात लंपी आजाराचा प्रादुर्भाव जनावरांवर दिसून येत आहे. लंपी हा जनावरांना होणारा विषाणुजन्य त्वचारोग आहे. यामध्ये जनावरांच्या शरीरावर फोड येऊन जखमा होतात. यामुळे आजार झाल्यानंतर जनावरांना ताप येणे, डोळे व नाकातून स्राव होणे, अंगावर गाठी येणे, लाळ गळणे, पायांना सूज येणे, चारा न खाणे अशी लक्षणे दिसून येतात. परिणामी दुधात घट होत असून अनेक जनावरे दगावत आहेत.

हेही वाचा… प्रेमसंबंध तोडल्यामुळे प्रेयसीचे अश्लील छायाचित्र प्रसारित

कधी नापिकी तर कधी अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या नशिबी कायम असताना यावर्षी झालेल्या अपुऱ्या पावसामुळे दुष्काळाचे सावट गडद होत चालले असतानाच आता पुन्हा ‘लंपी’ या विषाणुजन्य आजाराचा जनावरांवर प्रादुर्भाव वाढत चालला असून शेतकरी, दुग्ध व्यावसायिक दुहेरी संकटात सापडले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lumpy disease has reactivated in animals in washim pbk 85 dvr
Show comments