महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुरांवरील लंपी सदृश्य आजाराची लक्षणे नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील दोन गावांमध्ये दिसून आली आहे. पशुसंवर्धन विभागाने पाच किलोमीटर परिसरातील पशुपालकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सावनेर तालुक्यातील बडेगाव आणि उमरी जांभळापाणी या दोन गावांमध्ये लंपी रोगसदृश्य लक्षणे दर्शवणारे अनुक्रमे तीन आणि सहा अशा एकूण नऊ पशु रुग्णांची नोंद झाली.

बाधीत गावांना पशु चिकित्सकांनी भेट देऊन पशु रुग्णांची तपासणी केली.नमुने गोळा करण्याची प्रक्रिया राबवलेली आहे. दोन्ही गावांच्या आजूबाजूला पाच किलोमीटरच्या हद्दीमध्ये जवळपास वीस गावांचा समावेश होत असून त्यामध्ये सुमारे ५१२६ एवढ्या गोवंशीय पशुधनाची संख्या आहे. या गावातील पशुपालकांना सतर्क करण्यात आले आहे.

Story img Loader