बुलढाणा: जिल्ह्यातील लाखो पशुधन मालक, शेतकरी, संस्था व वाहतूकदार, शर्यत आयोजक यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. लम्पी चर्मरोगाची साथ आटोक्यात आल्याने बाजार भरविणे, वाहतूक, शर्यतीचे आयोजनावरील निर्बंध हटविण्यात आले आहे. मात्र यासाठी अटी शर्तीचे पालन करणे बंधनकारक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लम्पी या घातक चर्मरोगाचा प्रसार होऊ नये म्हणून मागील तीन महिन्यांपासून बाजार व वाहतुकीला बंदी घालण्यात आली होती. मागील २८ ऑगस्टच्या आदेशान्वये प्रतिबंध करण्यात आले होते. साथरोग आटोक्यात आल्याने वाहतूक व बाजार भरविण्यास सशर्त परवानगीचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी निर्गर्मित केले आहे.

हेही वाचा – उच्च शिक्षणासाठी गडचिरोलीतही ‘एकलव्य पॅटर्न’, जाणून घ्या सविस्तर…

हेही वाचा – वर्धा : सहकारी सूतगिरणीवर माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख गटाचा झेंडा

या आहेत अटी

जिल्ह्याअंतर्गत वाहतूक करावयाच्या गोवंशवर्गीय गुरांचे किमान २८ दिवसांपूर्वी लम्पी चर्मरोगाचे प्रतिबंधात्मक लसीकरण प्रमाणपत्र बाळगणे ही अट आहे. तसेच लम्पीची लक्षणे नसल्याचे पशुधन विकास अधिकारी (गट अ) यांचे आरोग्य प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक राहील. वाहतूक करणाऱ्या प्राण्यांचे स्वास्थ प्रमाणपत्र व वाहतूक प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागणार आहे. वाहतूक करावयाच्या गुरांची ओळख पटविण्यासाठी कानात १२ अंकी ‘टॅग’ असणे बंधनकारक आहे. पशूंच्या बाजारामध्ये खरेदी व विक्री करतेवेळी कानात ‘टॅग’ व स्वास्थ प्रमाणपत्र सोबत असणे बंधनकारक आहे. तसेच बाजारामध्ये गोचीड व गोमाशा निर्मुलन फवारणी करणे बाजार समिती व आयोजकास बंधनकारक आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lumpy under control in buldhana animal transport and market allowed scm 61 ssb