लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : ‘यू-ट्यूबवरील व्हिडिओला लाईक करा आणि दुप्पट रक्कम मिळवा’ अशी जाहिरात करून हजारो गुंतवणूकदारांना आमिष दाखवून लाखोंनी लुबाडणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या एका टोळीला नागपूर पोलिसांनी अटक केली. या टोळीने नागपुरातील केमीकल इंजिनिअरला ५४ लाखांनी फसविले. टोळीच्या ताब्यातून ८ लाख रुपये जप्त करून ३७ लाख रुपये असलेली चार बँक खाते गोठविले. तसेच १९ एटीएम, ९ मोबाईल आणि एक लॅपटॉपही जप्त केला, अशी माहिती पोलिस उपायुक्त अर्चित चांडक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

आकाश तिवारी (२९), रवि वर्मा (३३), संतोष मिश्रा (३९), तिन्ही रा. मुंबई, मित व्यास (२६), रा. गुजरात, अंकित टाटेर (३३) आणि अरविंद शर्मा दोन्ही रा. राजस्थान अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आकाश मार्बलचे काम करतो. रवि आकाशसाठी काम करतो. मित हा ट्रेडींगचे तर अरविंद हा सायबर गुन्हेगारीत सक्रिय आहे.

आणखी वाचा-अकोला : वीज बिल थकवले अन् अभियंत्याला देखील मारहाण; ग्राहकाला घडली तुरुंगवारी

बैरामजी टाउन येथील रहिवासी फिर्यादी घनश्याम गोविंदानी (३२) हे केमीकल इंजिनिअर आहेत. ते दुबईला नोकरी करीत होते. नोकरी सोडून ते नागपुरात आले आणि नोकरीच्या शोधात होते. नोकरीसाठी विविध वेबसाईटवर स्वत:चा ‘बायोडाटा’ टाकला. काही दिवसातच त्यांच्या मोबाईलवर एक ‘लिंक’ आली. त्यांना व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपमध्ये घेण्यात आले. त्यांना रिव्हींगचे वेगवेगळे टास्क पूर्ण करण्यास सांगितले. तसेच व्हिडिओला लाईक्स करण्यास सांगितले. त्या मोबदल्यात सायबर गुन्हेगारांनी सुरुवातील दुप्पट रक्कम परत केली.

गोविंदानी यांचा विश्वास बसला. नंतर हळूहळू ते सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकले. पाहता पाहता त्यांनी ५४ लाख ५८ हजार रुपये सायबर गुन्हेगारांकडे गुंतवले. त्यानंतर पैसे परत मिळणे बंद झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी विविध राज्यात जाऊन तांत्रिक तपास केला. विविध बँक अधिकाऱ्यांना भेटले. शेकडो सीसीटीव्ही तपासले. एक लिंक लागली आणि त्यामाध्यमातून सहा आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले.

आणखी वाचा-नागपूर: अनधिकृत सरोगसी,सरकारी यंत्रणा सतर्क

या टोळीचा मास्टरमाईंड चीनमधील सायबर गुन्हेगार असल्याचे समोर आले. भारतातील युवकांना लुबाडलेल्या रकमेतील १० टक्के पैसे दे ही कारवाई पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमित डोळस, सहायक निरीक्षक संदीप बागुल, मारूती शेळके, गजानन मोरे, सीमा टेकाम, अजय पवार, योगेश काकड, रविकुमार कुळसंगे, सुशील चंगोले, रोहित मटाले यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lure of video likes gang of cyber criminals arrested 45 lakh seized adk 83 mrj