नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना अश्लिल शिवीगाळ करणाऱ्या तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर शिवरायांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाला असला तरी शिवप्रेमींमध्ये अद्यापही खदखद कायम आहे. कोरटकरचा शोध सुरु असताना त्याच्या मालमत्ता, संपत्तीचे तपशील हळूहळू पुढे येऊ लागले आहेत. चीटफंड घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेल्या महेश मोतेवारची आलिशान कार कोरटकर वापरत असल्याची माहिती पुढे आली आहे. आलिशान कारचे फोटो आणि व्हिडिओ कोरटकरने स्वतःच सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुख्यात ठगबाज महेश मोतेवारने चिटफंडच्या माध्यमातून साडे चार लाख लोकांची फसवणूक केली. त्याने ४७०० कोटी रुपयांचा अपहार केला. या प्रकरणात पहिला गुन्हा पुण्यात नोंदवण्यात आला. मग धाराशिवमध्ये दुसऱ्या गुन्ह्याची नोंद झाली. यानंतर सीआयडीने तपास हाती घेतला. डिसेंबर २०१५ मध्ये मोतेवारला अटक झाली. तेव्हापासून तो तुरुंगात आहे. मोतेवारला अटक झाल्यानंतर त्याच्या मालकीच्या मालमत्तांचा लिलाव करण्यात आला. आता मोतेवारच्या कंपनीच्या नावे नोंद असलेली एवढी महागडी कार कोरटकरकडे सापडल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

गेल्या ९ वर्षांपासून तुरुंगात असलेल्या मोतेवारची रॉल्स रॉईस कार कोरटकरडे कशी आली?, त्याने ही कार लिलावातून विकत घेतली का?, हा लिलाव नेमका कधी झाला?, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रश्नांची उत्तरे कोरटकर देऊ शकतो. महेश मोतेवारने चिटफंडच्या माध्यमातून लाखो लोकांना कोट्यवधींचा गंडा घातला. त्याच्या विरोधात राज्यातच नव्हे, तर देशभरात गुन्हे दाखल आहेत. २२ राज्यांत त्याच्याविरोधात २८ गुन्ह्यांची नोंद आहे. तो सध्या ओडिशाच्या कटकमधील तुरुंगात आहे. कोरटकरकडे असलेल्या रोल्स रॉईसची किंमत जवळपास ७ कोटी रुपयांच्या घरात जाते. कारची नोंदणी मोतेवारच्या समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या नावे आहे.

कोरटकरने अद्याप माफी मागितली नाही

प्रशांत कोरटकरने सोशल मिडियावर शिवरायांना हार घालून नमस्कार केल्याचा व्हिडिओ व्हायरल केला. मात्र, त्याने केलेल्या कृत्याबाबत अद्याप माफी मागितली नाही. त्यामुळे देशभरातील लाखो शिवप्रेमींमध्ये अजनुही खदखद व्यक्त करण्यात येत आहे. प्रशांत कोरटकर याच्या डोक्यावर राज्यातील दोन बड्या नेत्यांचा हात आहे. कोरटकर हा आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांची बदली गृहमंत्रालयातून ‘आर्थिक संबंध’ ठेवून करुन देतो, अशी चर्चा आहे. ज्या आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करुन दिल्या आहेत किंवा त्यांना आर्थिक लाभ पोहचवला आहे, अशाच अधिकाऱ्यांसोबतो फोटो काढून सोशल मिडियावर टाकतो, अशी चर्चा आहे.