अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे विकसित केलेले कृषी यंत्रसामुग्री, प्रक्रिय यंत्र शेतकऱ्यापर्यंत पोहचण्यासाठी विद्यापीठ व यंत्र निर्मात्यांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या यंत्रांमुळे शेतकऱ्यांचे श्रम कमी होणार आहे. याचा मोठा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे.

कापणी पश्चात अभियांत्रिकी तंत्रज्ञान व कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाने विविध प्रक्रिया यंत्र विकसित केले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने दाल मिल, सफाई यंत्र, धान्य ड्रायर, भाजीपाला बिज यंत्र, सीताफळ गर काढणी यंत्र, जांभूळ गर काढणी यंत्र, हुरडा काढणी यंत्र, चारोडी फोडणी यंत्र आदी विकसित केले आहेत. कुलगुरू डॉ. एस. जी. गडाख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सामंजस्य कराराच्या कार्यक्रमाला संशोधन संचालक डॉ. व्ही.के. खर्चे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. उंदिरवाडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. एस. एस. माने, अधिष्ठाता कृषी डॉ. एस.आर. काळबांडे आदी उपस्थित होते. कापणी पश्चात अभियांत्रिकी तंत्रज्ञान व निर्मात्यांमध्ये सामंजस्य करार करण्यात आले.

Manikrao Kokate , Manikrao Kokate Chhagan Bhujbal,
छगन भुजबळ यांची समजूत काढण्याचा प्रश्नच नाही, माणिक कोकाटे यांची भावना
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Opposition protests in Legislative Assembly area on issue of getting guaranteed price for farmers
कापूस, धान, सोयाबीनच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक, विधान भवन परिसरात…
Maharashtra State Cabinet Expansion Satara district gets maximum ministerial posts
मराठ्यांना प्राधान्य… सातारा जिल्ह्यास सर्वाधिक मंत्रिपदे… मुंबई, नाशिकची बोळवण… मंत्रिमंडळ विस्ताराला नाराजीची किनार?
Moringa cheap Pune, housewives, Gujarat Moringa,
पुणे : शेवगा स्वस्त; गृहिणींना दिलासा, गुजरातमधून आवक वाढली
Why has fish production in Konkan decreased this year print exp
पाच वर्षांतला नीचांक… कोकणातील मत्स्य उत्पादन यंदा का घटले? निसर्गाइतकाच मानवही जबाबदार?
Paddy Growers, Gondia District, Paddy, 235 crore stuck,
२३५ कोटी शासनाकडे अडकले; गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादकांची कोंडी
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी

हेही वाचा >>>‘अमृत भारत स्टेशन योजनें’तर्गत स्थानकांचा विकास ; चंद्रपूर, बल्लारपूर रेल्वेस्थानक समावेश

यांत्रिकीकरणाचे महत्व आणि कृषी अभियांत्रिकी विभागाचा त्यात मोठा सहभाग असल्याचे कुलगुरूंनी नमूद केले. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी त्रि सूत्री पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्यामध्ये पहिले सूत्र उन्नत वाण व चांगले व्यवस्थापन करून उत्पादकता वाढवणे, यांत्रिकीकरणामुळे उत्पादन खर्च कमी करणे, योग्यवेळी कापणी, चांगले विपणन, किमान प्रक्रिया व पॅकिंग करून उत्पन्न वाढवता येते. कापणी पश्चात अभियांत्रिकी तंत्रज्ञान विभागामार्फत निर्मित विविध यंत्र, राज्य व देशपातळीवर पोहोचले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे श्रम कमी होऊन त्यांचे उत्पन्न वाढीमध्ये लाभ होईल, असा विश्वास डॉ. गडाख यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>>: हत्याकांडातील कैद्यावर कारागृहात लैंगिक अत्याचार

विद्यापीठाचे ५२ यंत्र विकसित

डॉ.पंदेकृविच्या कृषी अभियांत्रिकी विभागामार्फत ५२ यंत्र विकसित करण्यात आले. पीकेव्ही मिनी दाल मिल व सीताफळ गर काढणी यंत्र मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्मसात करीत आहेत. आतापर्यंत ३२ यंत्र निर्मात्यांसोबत करार करण्यात आले आहेत. सात हजारापेक्षा अधिक यंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहचले आहेत. विकसित यंत्रामुळे ग्रामीण भागात चांगले कृषी प्रक्रियेवर आधारित उद्योग सुरु झाले आहेत व शेतकऱ्यांच्या मालाचे मूल्यवर्धन होत असल्याचे प्रस्ताविकेमधे डॉ. एस. आर. काळबांडे यांनी सांगितले.

Story img Loader