भंडारा : भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करून काही काळ घालवलेले माजी खासदार मधुकर कुकडे यांनी तब्बल दहा वर्षानंतर पुन्हा भाजपात घरवापसी केली आहे. काटोल येथील जाहीर सभेत भाजप नेते शिवराजसिंह चौहान, भाजप प्रदेशाध्यक्ष चन्द्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. मतदानाच्या अवघ्या तीन दिवसांपूर्वी कुकडे यांनी पक्षांतर केल्यामुळे तुमसर मतदारसंघातील वातावरण चांगलेच तापले असून त्यांच्या पक्ष बदलामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार चरण वाघमारे यांना फटका बसणार का ? कुणबी समाजाचे मत आता कुणाकडे जाणार ? याबाबत राजकीय समिकरणे जुळवली जात आहेत.

मधुकर कुकडे हे पूर्वाश्रमीचे भाजपाचे आमदार होते.  २०१८ मध्ये त्यांनी भाजप उमेदवाराच्या विरोधात राष्ट्रवादीकडून लोकसभेची पोटनिवडणूक लढवली होती आणि खासदार झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असताना चार वर्षांत त्यांनी राष्ट्रवादीचे संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे यावेळी विधानसभेची उमेदवारी त्यांना मिळणार अशी आशा ते बाळगून होते. मात्र महाविकास आघाडीकडून चरण वाघमारे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यातच अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत असताना सेवक वाघाये यांच्या उमेदवारीमुळे कुकडे यांनी त्यांनी माघार घेतली. मात्र उमेदवारी न मिळाल्याची खदखद त्यांच्या मनात होतीच. त्यातूनच कुकडे यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.कुकडे हे कुणबी समाजाचे नेते आहेत. तुमसर मतदार संघात जवळपास ५० ते ६० हजार मतदार कुणबी समाजाचे आहेत. मतदानाच्या अवघ्या तीन दिवसांपूर्वी मधुकर कुकडे यांनी घेतलेला हा निर्णय कुणाच्या पथ्यावर पडणार? याबाबत चर्चा आहे.

pune mns Office bearers and activists became Active during elections time
पुण्यात ‘मनसे’ला मराठी माणसाची पुन्हा आठवण
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Gangasagar, who is now a 65-year-old ‘Aghori’ known as Baba Rajkumar
आश्चर्यच! २७ वर्षांपूर्वी घर सोडून गेलेला व्यक्ती महाकुंभमेळ्यात भेटला, पण…; कुटुंबाने केली डीएनए चाचणीची मागणी!
Deshmukh and Thakur clashed after BJPs Charan Singh thakur halted deshmukhs approved development works
माजी गृहमंत्र्यांची मंजूर कामे भाजप आमदाराने थांबवली
Widow practice, villages , Kolhapur,
कोल्हापुरातील दोन गावात विधवा प्रथा बंद, भेदभावाला मूठमाती देण्याचा ग्रामसभेचा निर्णय
Abhijeet Adsul , Shivsena , Amravati, Ravi Rana ,
“महायुतीत तोंड दाबून बुक्क्यांचा मार..”, अभिजीत अडसूळ यांची राणा दाम्पत्यावर टीका
नागपूर: ६० पदाधिकाऱ्यांच्या कार्यमुकीमुळे युवक काँग्रेसमध्ये वादंग, प्रदेशाध्यक्षांवर संताप
dhananjay munde vijay wadettiwar
पीक विमा योजनेत भ्रष्टाचार, तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या निर्णयाची चौकशी करा-वडेट्टीवार

हेही वाचा >>>तब्बल १० वर्षांनंतर मधुकर कुकडे यांची भाजपात घरवापासी

 १९९० मध्ये कुकडे यांनी काँग्रेसची सोडून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेने त्यांना तुमसर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. यात ते पराभूत झाले. त्यानंतर १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती झाली. यावेळी कुकडे यांना भाजपकडून संधी मिळाली. भाजपवासी झालेल्या कुकडे यांनी या निवडणुकीत बाजी मारली. त्यानंतरच्या सलग दोन निवडणुकांतही त्यांनी विजय मिळविला. २००९च्या निवडणुकीत मात्र त्यांना काँग्रेसचे अनिल बावनकर यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला. २०१४ च्या निवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारली. पक्षाच्या या निर्णयाने नाराज झालेल्या कुकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. मात्र यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या कुकडे यांच्या पदरी निराशाच आली. अखेर त्यांनी भाजपात घरवापसी केली.

Story img Loader