नागपूर : ‘मिसेस इंडिया शी इज इंडिया २०२३’च्या आठव्या आवृत्तीमध्ये नागपूरच्या माधुरी पाटलेने ‘मिसेसस युनिव्हर्स इंडिया २०२३’चा खिताब पटकावला. या स्पर्धेचे आयोजन नवी दिल्लीतील उमराव या प्रतिष्ठित ठिकाणी करण्यात आले होते.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
अदिती शर्मा यांनी विजेती स्पर्धक माधुरी पाटलेच्या डोक्यावर मुकुट घातला तर श्रुती कावेरी अय्यर आणि नयोनिता लोध यांनी सॅश बांधला. १ ते १० ऑक्टोबर या कालावधीत फिलिपिन्सच्या मनिला शहरात होणाऱ्या आगामी मिसेस युनिव्हर्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या नागपूर येथील माधुरी पाटले हिला भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला आहे. यावेळी माधुरी पाटले म्हणाली, हा विजय चिकाटीच्या सामर्थ्यांचा आणि आपल्या प्रत्येकामध्ये असलेल्या अथक आत्म्याचा दाखला आहे.
First published on: 04-09-2023 at 03:23 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhuri patle mrs universe india 2023 ysh