पूर्वजांनी निर्माण केलेल्या शास्त्रानुसार ज्योतिषशास्त्र निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे या शास्त्राचे व्यावसायिकरण न करता त्यात जुने शास्त्र कायम ठेवत नव्याने त्यात संशोधन करत अध्ययन करावे आणि नवीन पिढीपर्यंत ते पोहचवावे, असे प्रतिपादन कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. मधुसूदन पेन्ना यांनी केले.
हेही वाचा >>>नागपूर : वर्चस्वाच्या लढाईत एका बिबट्याचा मृत्यू, तर दुसरा बिबट अपघातात ठार
त्रिस्कंध ॲल्मनी अँड अस्ट्रोलॉजर्स असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय ज्योतिष अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. पर्सिस्टंट सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या अधिवेशनाच्या समारोपाला रामकृष्ण मठाचे स्वामी ज्ञानमुर्त्यानंद, संस्थेचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर कुळकर्णी, प्रा. कृष्णकुमार पांण्डेय आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. पेन्ना म्हणाले, प्राचीन आध्यात्मिक शास्त्राचा आधार घेत पूर्वजांनी ज्या पद्धतीने ज्योतिषशास्त्र मांडले आहे त्याच शास्त्राचा आधार घेत ज्योतिष सांगितले जाते किंवा त्यांचा अभ्यास केला जातो. मात्र, ज्योतिषशास्त्र ही एक तपस्या असून त्याचे अध्ययन करण्यासोबत त्यात नव्याने काय संशोधन करता येईल त्या दृष्टीने विचार करण्याची गरज आहे.
हेही वाचा >>>नागपूर : …अन् दोन तरुणींच्या ‘नाजूक’ नात्याचा गुंता सुटला
यावेळी स्वामी स्वामी ज्ञानमुर्त्यानंद म्हणाले, भारतीय संस्कृती आणि परंपरेचा विचार करून ज्येतिषशास्त्र समाजाला दिशा देण्याचे काम करत आहे. मात्र, या शास्त्राचा विचार करताना काय दिले या दृष्टीने विचार होण्याची गरज आहे. ज्योतिषशास्त्र हे ज्ञान आहे त्यामुळे ऋषी होऊन या ज्ञानाचा प्रचार प्रसार करावा असे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा >>>वैदर्भीय बेरोजगारांची फरफट; ४१३२ बेरोजगारांची नोंदणी, मात्र, नोकरी ३४७ जणांना
वाहिन्यांवरील ज्योतिषशास्त्रानुसार आहे?
ज्योतिष हा व्यवसाय असला तरी या शास्त्राचे जोपर्यंत आपण अध्ययन करणार नाही तोपर्यंत आपल्याला समाधान मिळणार नाही. या शास्त्राकडे केवळ व्यवसाय म्हणून न बघता नव्याने संशोधन करून आपल्याला त्यातून एक आनंद मिळेल या दृष्टीने त्याचा विचार केला पाहिजे. आज वेगवेगळ्या वाहिन्यावर ज्योतिष सांगितले जात असताना ते शास्त्रानुसार सांगितले जाते का, याचाही विचार होणे गरजेचे असल्याचे डॉ. पेन्ना म्हणाले.