नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्यांक सेलच्या पदाधिकारी सना खान यांच्या हत्याकांडात मध्यप्रदेशातील एका भाजपा नेत्याचा हात असल्याचा खळबळजनक आरोप सना खान यांच्या आई मेहरुनिसा खान यांनी प्रसार माध्यमांसमोर केला.

मेहरुनिसा खान यांनी केलेल्या आरोपानुसार, महाराष्ट्र-मध्यप्रदेशातील सना खान हत्याकांडात मध्यप्रदेशातील काही भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी अमित शाहू याला सहकार्य केले. मात्र, भाजपाच्या नेमक्या कोणत्या नेत्याचा हात या हत्याकांडात आहे, याबाबत मात्र त्यांनी काही सांगितले नाही. अमित शाहू आणि एका आमदाराच्या मेहुण्याने दुहेरी हत्याकांड घडविले होते. त्या हत्याकांडात आमदाराच्या आशीर्वादाने अमित जवळपास ११० दिवस फरार राहिला होता. त्यावेळीसुद्धा अमितला भाजपाच्या आमदाराने लपवून ठेवले होते. जबलपूर पोलिसांनीसुद्धा सना खान हत्याकांड दडपण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलीस आयुक्त अमितेश यांच्यामुळे आरोपींना अटक करण्यात यश आले, असेही मेहरूनिसा खान म्हणाल्या.

Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Aftab Poonawala, accused of Shraddha Walker's murder and dismemberment.
Lawrence Bishnoi Gang: बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर श्रद्धा वालकरचा मारेकरी; बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्याची कबुली
Immediate relief, Nawab Malik, High Court,
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल
Pansare murder case, ATS claim, high court,
पानसरे हत्या प्रकरणाचा सर्व पैलूंनी तपास, एटीएसचा उच्च न्यायालयात दावा
Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
Mithun Chakraborty gets threat from pakistani gangster Shahzad Bhatti
पाकिस्तानी गँगस्टरकडून मिथुन चक्रवर्ती यांना धमकी, मुस्लिमांबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्याचा उल्लेख करत म्हणाला…

हेही वाचा – गडचिरोली जवानांकडून नक्षल्यांचा तळ उद्ध्वस्त, महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर पोलीस नक्षल्यांमध्ये धुमश्चक्री

मध्यप्रदेश भाजपा प्रदेशाध्यक्षांनी जबलपूरमध्ये भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या शिबिराचे आयोजन केले होते. त्या शिबिरात महाराष्ट्र भाजपाच्या अल्पसंख्यांक सेलच्या प्रमुख सना खान निमंत्रित होत्या. भाजपाच्या त्याच शिबिरात अमित ऊर्फ पप्पू शाहू याच्याशी सना यांची भेट झाली होती. तीन दिवस चाललेल्या शिबिरात सना यांची भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांसोबत ओळख झाली होती. शिबीर संपल्यानंतर दोघांनी एकमेकांचे संपर्क क्रमांक घेतले होते. त्यानंतर अमित आणि सना यांच्यात मैत्री झाली नंतर या दोघांनी लग्न केले होते. त्यामुळे काही भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी होती. सना यांच्या खासगी आयुष्यात भाजपाच्या एका नेत्याने ढवळाढवळ केल्यानेच सना यांची हत्या झाल्याचा आरोप आहे.

हेही वाचा – नागपूर : उड्डाणपुलाच्या पाडकामातून निघाला २२ हजार मेट्रिक टन मलबा

चित्रफितीचा वाद कायम

प्रियकर अमित शाहू याने भाजपा नेत्या सना खान हिचा मोबाईल बघितला होता. मोबाईलमध्ये काही चित्रफिती आणि छायाचित्र होते. त्यावरून त्याचा सना यांच्याशी वाद झाला होता. सना यांनी चित्रफितीबाबत मौन बाळगल्याने अमितचा पारा चढला आणि सना यांचा खून करण्यात आल्याची चर्चा आहे.