मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान बुधवारी अचानक नागपूर दौ-यावर आले. ते थेट संघ मुख्यालयी गेले. तेथे सुमारे तासभर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी बंद्द्वार चर्चा केली. मध्यप्रदेश मध्ये होणा- या आगामी सार्वजनिक निवडणुकीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.
हेही वाचा >>>नागपूर : तर पुन्हा फडणवीसांच्या निवासस्थानापुढे हनुमान चालिसा पठण?
या वर्षी अखेर मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. राज्यातील सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. या राज्यात भाजपने कॉंग्रेस फोडून सत्ता बळकावली. . त्यामुळे कॉंग्रेसचे प्रयत्न पुन्हा सत्ता प्राप्तीचे आहेत. तर दुसरीकडे कॉंग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मुख्यमंत्री शिवराज चव्हाण मध्यप्रदेश मध्ये विकास यात्रा काढणार आहे. पार्श्वभूमीवर चव्हाण यांची संघ प्रमुखांशी झालेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.