नागपूर : पूर्व नागपुरातील दर्शन कॉलनी मैदानात होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेविरोधात मैदान बचाव कृती समितीच्यावतीने होणारी महाआरती ऐनवेळी रद्द करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – वर्धा: मोकाट श्वान पिसाळले! पाच बालकांवर हल्ला, संतप्त गावकऱ्यांनी एका श्वानस केले ठार

हेही वाचा – अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीच्या मुलाचा प्रियकराने आवळला गळा

सभेपुढे मैदान खराब होईल व आजूबाजूच्या लोकवस्तीला सभेचा त्रास होईल म्हणून मैदान बचाव समिती गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन करत आहे. सभेच्या दिवशी रविवारी सभेच्या ठिकाणी परिसरातील नागरिक व भाजपाचे माजी नगरसेवक महाआरती करणार होते. मात्र हा कार्यक्रम
रद्द करण्यात आल्याचे आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले. दरम्यान भाजपाचे माजी नगरसेवक हरीश डीकोंडवार यांनी आमचे आंदोलन सुरू राहणार असल्याचे सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maha aarti against maha vikas aghadi sabha canceled in nagpur vmb 67 ssb