लोकसत्ता टीम
अमरावती: भारताच्या अंतराळ संशोधनाच्या दृष्टीने आजचा दिवस मोलाचा मानला जात आहे. चांद्रयान-३ आज चंद्राच्या काळोख्या बाजूला उतरत आहे. चांद्रयान-३ च्या विक्रम लँडरकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही मोहीम यशस्वी झाली, तर चंद्रावर रोव्हरद्वारे संचार करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे.
आणखी वाचा-नक्षल चळवळीला मोठा धक्का, दोन वरिष्ठ नेत्यांना अटक
या पार्श्वभूमीवर शास्त्रज्ञ सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. देशवासीय प्रार्थना करीत आहेत, तर अमरावतीत भाजपचे राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांनी येथील अंबादेवी मंदिरात आज दुपारी महाआरतीचे आयोजन केले. महाआरतीच्या वेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, राजेश वानखडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. अनिल बोंडे यांनी चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगसाठी अंबादेवी मंदिरात प्रार्थना केली.