नागपूर: महाविकास आघाडीत शिवसेना (ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) यांना प्रत्येकी ८५ जागांचे वाटप निश्चित करण्यात आले. उर्वरित काही जागांसाठी चर्चा करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीमध्ये मागील काही दिवसांपासून जागावाटपाच्या मुद्द्यावरुन वाद सुरु असतानाच आता उमेदवारी यादीमध्येही या वादाचे प्रतिबिंब पाहायला मिळत आहे. काँग्रेसने काल सकाळी दुसरी यादी जाहीर केल्यानंतर रात्री उशीरा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. मात्र, यात नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथील उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने (शरद पवार) रविवारी हिंगणा विधानसभा मतदारसंघातून रमेश बंग यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे शहरात नागपूर पूर्व आणि आता जिल्ह्यातील हिंगणा, काटोल अशा तीन जागा राष्ट्रवादीला मिळाल्या. पूर्वी राष्ट्रवादीकडे ग्रमीणच्या दोनच जागा होत्या. पुन्हा एक जागा राष्ट्रवादीने आपल्या पारड्यात पाडून घेतली. हिंगणाममधून राष्ट्रवादीने माजी मंत्री रमेश बंग यांना उमेदवारी दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा