नागपूर : संभाजीनगरमध्ये झालेल्या मविआच्या पहिल्या सभेत व्यासपीठावर इतर नेत्यांच्या तुलनेत उद्धव ठाकरे यांची खुर्ची उंच होती. त्यावरून भाजपाने टीकाही केली होती. उद्धव यांना प्रकृतीच्या कारणावरून उंच खुर्ची देण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. पण नागपूरच्या सभेत मात्र सर्व प्रमुख नेत्यांच्या खुर्च्या समान उंचीच्याच असणार आहेत.
हेही वाचा – वर्धा: मोकाट श्वान पिसाळले! पाच बालकांवर हल्ला, संतप्त गावकऱ्यांनी एका श्वानस केले ठार
हेही वाचा – अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीच्या मुलाचा प्रियकराने आवळला गळा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना ही बाब स्पष्ट केली. ते म्हणाले, खुर्चीबाबत सूचना देण्यात आला आहेत. संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांना त्यांच्या प्रकृतीच्या कारणांमुळे त्यांना उंच खुर्ची देण्यात आली होती. यावेळी त्याच्या खुर्चीच्या उंची इतक्याच उंच खुर्च्या काँग्रेस, राष्ट्रवादी नेत्यांच्या असतील.