बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी संघटनेच्यावतीने ९ व १० फेब्रुवारीला संपूर्ण देशभरात दोन दिवसांचा संप पुकारला आहे. शहरात युनायटेड फोरम ऑफ महाबँक युनियनच्यावतीने आज संपामध्ये दुचाकी फेरी काढून विविध मागण्या करण्यात आल्या. महाबँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. नोकरभरतीसाठी द्विपक्षीय करार व त्याचे पालन, काम आणि कुटुंब यात सामंजस्य व मनमानी बदल्याच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे.

शहरात बँक ऑफ महाराष्ट्रच्या शिवाजी महाविद्यालय शाखेपासून दुचाकी फेरी काढण्यात आली. ती रेल्वेस्थानक चौक, टॉवर चौक, मुख्य डाकघर मार्गे गांधी मार्गावरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत पोहोचली. यावेळी आपल्या मागण्यांसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. १० फेब्रुवारीला बँक ऑफ महाराष्ट्रच्या अंचल कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.

Avoid paying salary to ST employees before Diwali citing code of conduct
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत नवीन घडामोड, दिवाळीपूर्वी…
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक…
loksatta analysis pune witnesses alarming rise In crime rate
पुणे गुन्हेगारीत नाही उणे! राज्याची सांस्कृतिक राजधानी असंस्कृत, असुरक्षित का बनतेय?
cash transactions restrictions
रोखीच्या व्यवहारांवरील निर्बंध काय आहेत?
cyber thieves, people cheated, cyber crime,
सायबर चोरट्यांकडून तीन कोटींहून अधिक रकमेचा गंडा, नऊ जणांची फसवणूक
important news regarding faculty recruitment What is the new policy
प्राध्यापक भरतीसंदर्भात मोठी बातमी! प्राध्यापकांच्या भरतीसाठी आलेले नवीन धोरण काय माहिती आहे काय?
Mahadev Jankar left Mahayuti, Gangakhed BJP,
‘सुंठे वाचून खोकला गेला’ जानकरांच्या भूमिकेनंतर गंगाखेडमध्ये भाजपला आनंद
Job Opportunity Vacancies in Railway Recruitment Board career news
नोकरीची संधी: रेल्वे भरती बोर्डात रिक्त पदे

हेही वाचा – नागपूर : प्रेयसीची आत्महत्या, प्रियकरासह आईवर गुन्हा दाखल

बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज असोसिएशनचे विदर्भ अध्यक्ष श्याम माईणकर म्हणाले, बँकेतील ११४५ शाखांतून सफाई कर्मचारी नेमले नाहीत, ६४५ शाखांमध्ये शिपाई नाहीत. सफाई कर्मचारी व शिपाई ही दोन्ही पदे रिक्त आहेत. याचा बँकेच्या ग्राहक सेवेवर परिणाम होत आहे. याशिवाय मृत्यू सेवानिवृत्ती, पदोन्नती, स्वेच्छानिवृत्ती यामुळे रिक्त झालेल्या लिपिक व अधिकारी यांची पदे भरली नाहीत. सरकारकडून जन-धन व इतर योजना राबवल्या जातात, सेवानिवृत्ती, आधार, अनुदान वाटप ही सगळी कामे बँकेतूनच सुरू आहेत. त्यामुळे, कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. व्यवस्थापनाने संघटनेशी केलेले करार धाब्यावर बसवून कर्मचाऱ्यांशी निगडित सर्व प्रश्नावर व्यवस्थापन एकतर्फी निर्णय घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा – ‘सामना’तील अग्रलेखावर काँग्रेसचे प्रत्युत्तर, मित्र पक्षाच्या निर्णयावर मत व्यक्त करणे अयोग्य

या आंदोलनामध्ये प्रवीण महाजन, अतुल वर्मा, प्रबोध घिर्णीकर, प्रवीण कुटारिया, गौरव इंगोले, प्रजय बंसोड, रितेश गावंडे, सागर खवले, जितेंद्र येळमे, अविनाश आखरे, सतीश धुमाळे, विशाल गायकवाड, अनिल मावळे, अनिल बेलोकर, शुभांगी मानकर, प्रदीप देशपांडे, विजय वाहाणे, शैलेन्द्र कुलकर्णी आदींसह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.