यवतमाळ : ‘वापरा आणि फेका’, हे भारतीय जनता पक्षाचे तत्व आहे. त्यामुळे मित्र पक्षांचा वापर करून भाजप त्यांना बाजूला सारतो. मोठी माणसं पक्षात आल्यानंतर छोट्या माणसांचीही भाजपला गरज उरत नाही, अशी टीका राष्ट्रीय समाजपक्षाचे अध्यक्ष तथा माजीमंत्री महादेव जानकर यांनी केली. ते आज शुक्रवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपसोबत असताना रासपचे केवळ २३ नगरसेवक होते. आता ही संख्या ९८ वर पोहोचली आहे. रासपचे नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यही आहेत. रासपची ताकद पूर्वीपेक्षा चौपट वाढल्याचे जानकर म्हणाले. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष छोट्या पक्षांचा केवळ वापर करतात. मात्र येत्या लोकसभा निवडणुकीत आमची ताकद त्यांना दाखवू, असा इशारा जानकर यांनी दिला.

हेही वाचा – शंभरात ६५ टक्के नागरिकांना हिरड्यांचे आजार, राष्ट्रीय पेरियोडॉन्टिस्ट दिवस विशेष

छोटा पक्षही मोठ्या पक्षाचा जीव घेऊ शकतो याची जाणीव लवकरच भाजपला होईल, असेही जानकर म्हणाले. रासपची ताकद वाढवीण्यासाठी आपण अहोरात्र फिरत असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या चौकात आपली ताकद कशी वाढवता येईल याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष दिले पाहिजे, असा सल्लाही जानकर यांनी दिला. सर्व समाजाला सक्तीचे आणि मोफत शिक्षण मिळावे, तसेच वयाच्या ५५ वर्षांनंतर सर्व नागरिकांना शासनाने मोफत आरोग्य सेवा दिली पाहिजे. युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी बिजभांडवल द्यावे, असेही महादेव जानकर यावेळी म्हणाले.

हेही वाचा – रजा रोखीकरण रद्द केल्याने पोलीस दलात नाराजी, पोलिसांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केला संताप

बारामती ही माझी युद्धभूमी आहे. मी दुसऱ्या मतदारसंघात उभा राहिलो असतो तर मला कोणी विचारले नसते. बारामतीच्या जनतेच्या मनात महादेव जानकर आणि राष्ट्रीय समाज पक्ष आहे. सुप्रिया सुळे असो किंवा सुनेत्रा पवार ज्यांच्या पारड्यात राष्ट्रीय समाज पक्षाची मते जाईल तोच बारामतीचा खासदार होईल, असा विश्वास महादेव जानकर यांनी यावेळी व्यक्त केला.