वाशिम : खासदार भावना गवळी या लढवय्या नेत्या आहेत. त्यांना दिल्लीचा दरवाजा खुला असावा. तुम्ही गवळी यांना तिकीट द्या. जर तसे झाले नाही तर मी माझ्या पक्षाकडून त्यांना तिकीट देईल. असे रासप चे नेते महादेव जानकर यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर म्हणाले .

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हा क्रीडा संकुल येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले त्यावेळी महादेव जानकर बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पाणी पुरवठा मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, गोपीकिशन बाजोरिया, किरण सरनाईक यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना महादेव जानकर म्हणाले की, खासदार भावना गवळी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण आशीर्वाद द्यावे, त्यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी, अन्यथा त्यांना मी माझ्या पक्षाकडून उमेदवारी देईल. माझा पक्ष त्यांच्या पाठीशी उभा राहील.

हेही वाचा…नागपूर : डॉ. सुभाष चौधरी यांच्या निलंबनाला अंतरिम स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

अपक्ष शिक्षक आमदार किरणराव सरनाईक शिवसेना शिंदे गटात

यावेळी अमरावती शिक्षक मतदार संघातील विधान परिषद सदस्य किरण राव सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.