वर्धा : सर्वाेदय संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आरोपी सुनील केदार यांची नियुक्ती म्हणजे गांधी विचांराची हत्याच होय, असा घणाघात महादेव विद्रोही यांनी केला आहे.
गांधीवादी संस्थांची शिखर संस्था असलेल्या सर्व सेवा संघावर प्रभुत्व ठेवण्यासाठी चंदनपाल-काकडे व महादेव विद्रोही-खैरकार या दोन गटात गत एक वर्षापासून चांगलीच जुंपली आहे. त्यातच चंदनपाल गटाने काही महिन्यांपूर्वी झालेल्या अधिवेशनात बहुमताने सर्व सेवा संघावर ताबा मिळवला. यानंतर विरोधी विद्रोही गटाने चंदनपाल गटावर सातत्याने आरोपांचे आसूड ओढणे सुरू केले आहे.
चंदनपाल अध्यक्ष असलेल्या सर्व सेवा संघाच्या सर्वाेदय समाज राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन १४ ते १६ मार्चदरम्यान सेवाग्राम आश्रम परिसरात होत आहे. त्याच्या स्वागताध्यक्षपदावर माजी मंत्री सुनील केदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीवर महादेव विद्रोही यांनी जोरदार टीका करत नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा – “..आणि सोनाली कुलकर्णी पुन्हा एकदा प्रेमात”
केदार यांना न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. सध्या ते जामिनावर बाहेर आहे. काेट्यवधी रुपयांच्या बँक घोटाळ्यात ते आरोपी आहे. अशी व्यक्ती गांधीवादी संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी असणे म्हणजे गांधी विचारांची हत्याच होय. देव त्यांना सदबुद्धी देवो, अशी भावना विद्रोही यांनी महादेव व्यक्त केली.