लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला : महाकुंभमेळासाठी प्रयागराज येथे भाविकांना सुविधा होण्यासाठी रेल्वेने नियोजन केले. प्रयागराजसाठी असंख्य विशेष गाड्या सोडल्या आहेत. त्याचा परिणाम नियमित गाड्यांवर झाला. भुसावळ विभागातून धावणाऱ्या तब्बल १२ गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

महाकुंभमेळासाठी प्रयागराज येथे मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. कोट्यवधी भाविक येथे दाखल होत आहे. भाविकांच्या वाढत असलेल्या प्रचंड गर्दीमुळे रेल्वेचे देखील नियोजन कोलमडल्याचे चित्र आहे.

प्रयागराज मंडळात महाकुंभमेळाच्या निमित्ताने भुसावळ मंडळातून धावणाऱ्या १२ गाड्या प्रारंभिक स्थानकावरून रद्द राहतील. गाडी क्रमांक १९०४५ सूरत-छपरा ताप्ती गंगा एक्सप्रेस १९ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत रद्द, गाडी क्रमांक १९०४६ छपरा-सूरत ताप्ती गंगा एक्सप्रेस २१ फेब्रुवारी रोजी रद्द, गाडी क्रमांक १९४८३ अहमदाबाद-बरौनी एक्सप्रेस १८ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत रद्द, गाडी क्रमांक १९४३५ अहमदाबाद-आसनसोल एक्सप्रेस २० आणि २७ फेब्रुवारी रोजी रद्द, गाडी क्रमांक ०१०२५ दादर-बलिया त्रि-साप्ताहिक एक्सप्रेस विशेष गाडी १८ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत रद्द, गाडी क्रमांक ०१०२६ बलिया – दादर त्रि-साप्ताहिक एक्सप्रेस विशेष गाडी २१ फेब्रुवारी रोजी रद्द, गाडी क्रमांक ०१०२७ दादर – गोरखपूर एक्सप्रेस विशेष गाडी १८ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत रद्द, गाडी क्रमांक ०१०२८ गोरखपूर – दादर एक्सप्रेस विशेष गाडी २० फेब्रुवारी रोजी रद्द, गाडी क्रमांक ११०५५ लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर एक्सप्रेस १८ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत रद्द, गाडी क्रमांक ११०५६ गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस २१ फेब्रुवारी रोजी रद्द, गाडी क्रमांक ११०५९ लोकमान्य टिळक टर्मिनस – छपरा एक्सप्रेस १८ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत रद्द, गाडी क्रमांक ११०६० छपरा – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस २० फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आली आहे.

काही गाड्यांचे मार्ग परिवर्तन

रेल्वे प्रशासनाने महाकुंभमेळादरम्यान भुसावळ विभागातून जाणाऱ्या काही गाड्यांचे मार्ग परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या नियोजित मार्गाऐवजी प्रयागराज छिवकी येथून चार गाड्या धावणार आहेत. आपल्या नियोजित मार्गाऐवजी कानपुर, लखनऊ मार्ग १२ गाड्या जाणार आहेत. रेल्वेने केलेल्या या बदलामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाचा सामना करावा लागणार आहे.