अकोला : प्रयागराज येथील महाकुंभमेळामध्ये कोट्यवधी भाविक सहभागी होत आहेत. या भाविकांच्या सुविधेसाठी रेल्वेने विविध उपाययोजना केल्या आहेत. प्रयागराज येथे जाण्यासाठी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन विदर्भ, मराठवाडा येथील भाविकांच्या सुविधेसाठी दोन विशेष गाड्यांच्या सहा फेऱ्या धावणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रयागराज येथील कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा आहे. हा मेळा त्रिवेणी संगमावर भरला. या मेळ्यात कोट्यवधी भाविक आध्यात्मिक शुद्धीकरणासाठी पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. देश, विदेशातून भाविक प्रयागराज येथे दाखल होत आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर ते पटनादरम्यान कुंभमेळा विशेष गाडीच्या चार फेऱ्या होणार आहेत. कुंभमेळा विशेष गाडी क्रमांक ०७१०१ १९ आणि २५ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथून १९.०० वाजता सुटेल आणि पटना येथे तिसऱ्या दिवशी १०.३० वाजता पोहोचेल. कुंभमेळा विशेष ट्रेन क्रमांक ०७१०२ दिनांक २१ आणि २७ फेब्रुवारी रोजी पटना येथून १५.३० वाजता सुटेल आणि औरंगाबाद येथे तिसऱ्या दिवशी ०७.४५ वाजता पोहोचेल. या गाडीला जालना, सेलू, परभणी, पूर्णा, बसमत, हिंगोली डेक्कन, वाशीम, अकोला, मलकापुर, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपुर, जबलपुर, कटनी, मैहर, सतना, मानिकपुर, प्रयागराज छिवकी, पंडित दीन दयाल उपाध्याय, बक्सर, आरा आणि दानापुर येथे थांबा राहील. एक वातानुकूलित द्वितीय, आठ वातानुकूलित तृतीय, नऊ शयनयान, दोन सामान्य श्रेणी, एक जनरेटर कार आणि एक लगेज कम गार्ड्स ब्रेक व्हॅन अशी गाडीची संरचना राहणार आहे.

काचीगुडा ते पटना कुंभमेळा विशेष गाडीच्या दोन फेऱ्या होतील. कुंभमेळा विशेष गाडी क्रमांक ०७१०३ काचीगुडा येथून २२ फेब्रुवारी रोजी १६.४५ वाजता सुटेल आणि पटना येथे तिसऱ्या दिवशी १०.३० वाजता पोहोचेल. कुंभमेळा विशेष ट्रेन क्रमांक ०७१०४ पटना येथून २४ फेब्रुवारी रोजी ११.३० वाजता सुटेल आणि काचीगुडा येथे तिसऱ्या दिवशी ०७.०० वाजता पोहोचेल. या गाडीला बोलारूम, मेडचल, कमारेड्डी, निझामाबाद, बासर, धर्माबाद, उमरी, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली डेक्कन, वाशीम, अकोला, मलकापुर, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपुर, जबलपुर, कटनी, मैहर, सतना, मानिकपुर, प्रयागराज छिवकी, पंडित दीन दयाल उपाध्याय, बक्सर, आरा आणि दानापुर येथे थांबा राहील. एक वातानुकूलित द्वितीय, आठ वातानुकूलित तृतीय, नऊ शयनयान, दोन सामान्य श्रेणी, एक जनरेटर कार आणि एक लगेज कम गार्ड्स ब्रेक व्हॅन अशी गाडीची संरचना राहील.