नागपूर : शाळांचे नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले असून, महामेट्रोने त्यांच्या गाड्यांचे वेळापत्रकामध्ये बदल केले असून दर १० मिनिटांनी मेट्रो सेवा सुरू केल्या. ज्यामुळे नागरिकांचा कल मेट्रोकडे वाढत आहे.ज्यामध्ये शैक्षणिक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात मेट्रोचा उपयोग करीत आहे. महामेट्रोच्यावतीने नागपुरातील शाळा आणि कॉलेजमध्ये शिबिराच्या माध्यमाने अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते. येत्या आठवड्यात यशोदा,आदर्श विद्या मंदिर, हडस, सोमलवार या शाळांमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
नागपूर मेट्रोच्या खापरी,ऑटोमोटिव्ह चौक, प्रजापती नगर आणि लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन या चारही टर्मिनल स्टेशनवरून मेट्रोसेवा सकाळी ८ ते रात्री ८ या दरम्यान दर १० मिनिटांनी उपलब्ध आहे तसेच नागपूर मेट्रोच्या वतीने प्रवाश्यान करता अनेक उपक्रम तसेच सुलभ, सुविधाजनक, किफायतशीर सोई करण्यात आलेल्या आहे ज्यामध्ये प्रामुख्याने तिकीट काउंटर ,तिकीट व्हेंडिंग मशीन, तिकीट बुकिंग ॲप, महाकार्ड (१० % सवलत), विद्यार्थी महाकार्ड (३० % सवलत)आणि व्हॉट्सऍपव्दारे तिकीट काढण्याची सोय आदींचा समावेश आहे. मेट्रोने प्रवास करणाऱ्या नागपुरातील सर्व शाळा व कॉलेज विद्यार्थ्यांना मेट्रो संदर्भात कुठलीही कुठलीही शंका असल्यास त्यांनी मेट्रो रेल प्रशासनाशी संपर्क साधावा जेणेकरून शिबिराच्या माध्यमाने त्यांच्या समस्येचे निराकरण करता येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा >>>बिबट शिकारीच्या मागे धावला अन्ं विहिरीत पडला, पण मग जे घडले…
नागपूर मेट्रोने प्रवासी तिकीट दरात फेररचना केली असून भाड्यात ३३ टक्केपर्यंत कपात करण्यात आली आहे तसेच विद्यार्थ्यांना महाकार्डवर मिळणाऱ्या ३० टक्के सवलतीशिवाय नव्या संरचनेनुसार शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थीकरता हे भाडे जवळपास ५० टक्केपर्यत कमी झाले आहे. शहरात अलीकडच्या काळात रस्ते अपघात झाले आहेत, सुरक्षित आणि सुरक्षित प्रवासासाठी मेट्रोने प्रवास करण्याचे आवाहन महा मेट्रोच्या वतीने विद्यार्थ्यांना करण्यात येत आहे. त्यासोबतच मेट्रो ट्रेनमध्ये (कुठलेही अतिरिक्त भाडे न घेता) सायकल सोबत घेऊन जाण्याची परवानगी देते ही सुविधा विद्यार्थ्यांना त्यांच्या गंतव्य ठिकाणी पोहचवण्याची सुविधा देते. महामेट्रोने नुकतेच व्हॉट्सऍप तिकीट सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे केवळ प्रवासाचा वेळच वाचत नाही तर यामुळे तिकीट खरेदीसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांनी सुरक्षित प्रवासासाठी मेट्रोने प्रवास करावा, असे आवाहन महामेट्रोने केले आहे. ओव्हरहेड विद्युत वाहिन्यांमध्ये मेट्रोची सेवा मागच्या आठवड्यात विस्कळित झाली होती. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयींना तोंड द्यावे लागले होते. प्रशासनाने तत्काळ पावले उचलून सेवा सुरळित केली होती. या पार्श्वभूमीवर मेट्रोने शिबिरांचे आयोजन केले असल्याची माहिती आहे.