नागपूर: नागपूर शहरात चारही दिशांना धावणाऱ्या मेट्रो गाड्यांमध्ये महामेट्रोने ‘सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ या उपक्रमाची सुरूवात केली आहे. वाढदिवस, उत्सव,स्नेहसंमेलन, साखरपुडा व तत्सम कार्यक्रमांसाठी मेट्रोचे डब्बे भाड्याने मिळणार आहे.कार्यक्रमाच्या एक आठवडा आधी गाडीसाठी बुकिंग करता येईल. दर तासाला पाच हजार रुपये, असे दर यासाठी निश्चित करण्यात आले आहे. या उपक्रमाला शहरवासीयांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, असा दावा महामेट्रोने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुलभ बुकिंग प्रक्रिया

‘सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ उपक्रमांतर्गत ट्रेन बुकिंगची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. कार्यक्रमाच्या तारखेच्या एक महिना किंवा एक आठवडा आधी झाशी राणी मेट्रो स्टेशन किंवा खापरी मेट्रो स्टेशनवर बुकिंग एक किंवा दोन तासांच्या कालावधीसाठी करता येते.

हेही वाचा >>>“झोपडपट्टीवासीयांना मालकी हक्काचे पट्टेपाटप येत्या डिसेंबरपर्यंत”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

सजावटीसाठी एक तास वेळ

कार्यक्रमासाठी गाडीची अंतर्गत सजावट करून दिली जाते. मेट्रो गाडीची क्षमता २०० लोकांची आहे.कार्यक्रमादरम्यान मेणबत्त्या किंवा कोणत्याही ज्वलनशील वस्तूंवर बंदी आहे. आयोजक नाश्त्यासाठी अन्नाची पाकिटे आणि पाण्याच्या बाटल्या देऊ शकतात. प्रवासा दरम्यान व्यवस्था राखण्यासाठी मेट्रोचे अधिकारी, सुरक्षा रक्षक आणि सफाई कर्मचारी तैनात असतात.